‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
डॉ. भालचंद्र चव्हाण यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये ‘आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील तात्काळ प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचे पुनर्वसन यासाठी सक्षम व सुसूत्र यंत्रणा’ या महत्त्वपूर्ण विषयावर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. भालचंद्र प्र. चव्हाण यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत शुक्रवार, 1, शनिवार, 2 आणि सोमवार, 4 मे 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित होईल. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात हीच मुलाखत मंगळवार, 5 मे 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि महासंचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ही मुलाखत निवेदिका उन्नती जगदाळे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रासारख्या भौगोलिक विविधता असलेल्या राज्यात पूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळे, भूकंप अशा नैसर्गिक तसेच विविध आपत्तींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम, तत्पर आणि सुसूत्र करण्यावर विशेष भर दिला आहे. त्या अनुषंगाने आपत्तीपूर्व तयारी, मॉक ड्रिलचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ‘झिरो कॅज्युअल्टी’ या उद्दिष्टावर आधारित कार्यपद्धती याविषयी सातत्याने विविध उपक्रम घेण्यात येत असून जनजागृतीवरही भर दिला जात आहे.
'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात घेण्यात आलेल्या या विशेष मुलाखतीत संचालक डॉ. चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना, आपत्तींचे प्रकार आणि त्यांचे स्वरूप याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पूर, भूकंप, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींसोबतच अपघात, आग, धोकादायक पदार्थांशी संबंधित घटना अशा आपत्तींचाही त्यांनी सखोल ऊहापोह केला आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापन चक्रातील प्रतिबंध, तयारी, प्रतिसाद आणि पुनर्वसन या चार महत्त्वाच्या टप्प्यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले आहे.
आपत्तीच्या काळात नागरिकांनी घ्यावयाची काळजी, प्रशासनाची जबाबदारी, तसेच विविध यंत्रणांमधील समन्वय आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग याविषयी या मुलाखतीतून सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
#DGIPR
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR�
Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR�
YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR�


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा