सोमवार, १३ एप्रिल, २०२६

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे.

 


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिनानिमित्त मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ.


#बाबासाहेबआंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपटासह, चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमांवरून तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण करण्यात येणार आहे. जयंती दिनानिमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे.

याचबरोबर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे दुपारी १.३० वाजता प्रसारण करण्यात येणार आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा