बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

‘स्वच्छता ही सेवा पंधरवड्या’ निमित्त विभागीय आयुक्तालयात टाकावू पासून कलाकृतींची निर्मिती प्रदर्शन

                                    ‘स्वच्छता ही सेवा पंधरवड्या’ निमित्त विभागीय आयुक्तालयात

टाकावू पासून कलाकृतींची निर्मिती प्रदर्शन

 






अमरावती, दि. 01 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती प्रित्यर्थ 2 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर हा कालावधी ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा म्हणून विभागात सर्वत्र राबविण्यात आला असून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रमही या कालावधीत घेण्यात आले. या विषयावर आधारित वेस्ट टु आर्ट म्हणजे टाकावू वस्तूपासून निर्माण केलेल्या विविध कलाकृती, शोभेच्या वस्तूंचे प्रदर्शन विभागीय आयुक्त कार्यालयात आज भरविण्यात आले. सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के यांच्या हस्ते या प्रदर्शनचे उद्घाटन करण्यात आले. विभागीय आयुक्तालायातील सर्व शाखांचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनमध्ये आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी उर्त्स्फुतपणे सहभाग घेत त्यांच्याव्दारे पंधरवड्याच्या कालावधीत निर्माण केलेल्या विविध कलाकृती ठेवण्यात आल्या होत्या.

कर्मचाऱ्यांनी निर्माण केलेल्या विविध कलाकृतींमध्ये टाकावू वस्तूपासून तयार केलेले घराच्या प्रवेशव्दारावरील तोरण, फ्लॉवर पॉट, पेन स्टॅन्ड, देवाचे मंदीर, फुलझाडांसाठी कुंड्या, वेस्ट नारळापासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, कॅलेंडर, प्रधानमंत्री सौर मोफत वीज योजना/ हरित उर्जेचा वापर याबाबत जनजागृतीची कलाकृती तसेच स्वच्छतेचा संदेश अधोरेखित करणाऱ्या विविध सुंदर कलाकृतींचा समावेश आहे.

आज भरविण्यात आलेल्या प्रदर्शन व स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छता व टाकावू वस्तूपासून टिकावू वस्तू निर्मितीसंबंधीचे महत्व कळण्यासाठी उपक्रम घेण्यात आला आहे. तसेच या प्रदर्शनीच्या स्पर्धेतून उत्कृष्ठ कलाकृती निर्मात्यांना विजेता म्हणून घोषित करुन 2 ऑक्टोबरला पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. कापडी पिशव्यांच्या वापराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृतीसाठी ‘सेल्फी विथ थैला’ ही संकल्पना सुध्दा राबविण्यात येणार, अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के यांनी यावेळी दिली.

 

0000

--

1420 कोटी रूपयांतून दर्जेदार विकासकामे होणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

                                          

                                                 1420 कोटी रूपयांतून दर्जेदार विकासकामे होणार 

                                                                                             -उपमुख्यमंत्री अजित पवार




  *   विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन


*  वाढीव कराबाबत ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही


 

अमरावती, दि. 26 : अमरावती शहर आणि परिसराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. यातून शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होतील. एकाच दिवशी 1420 कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले आहे. ही कामे दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 

जिल्हा नियोजनच्या सभागृहात आज विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, मुख्य अभियंता गिरीश जोशी, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रुपा गिरासे आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, शासनाला उत्पन्न देणाऱ्या विभागांकडून मोठ्या प्रमाणावर कर गोळा करण्यात येत आहे. या विभागांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. विकासकामे करताना पुढील काळाचा विचार ठेवण्यात आला आहे. सारथी संस्थेमध्ये 300 आसन क्षमतेचे श्रोतागृह मंजूर आहे. मात्र याठिकाणी 500 विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय राहणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व सारथीच्या ठिकाणी आता 500 क्षमतेचे श्रोतागृह राहणार आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त निधीही देण्यात येणार आहे. एकाच दिवशी 1420 कोटी रूपयांच्या विविध कामांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले आहे. या सुविधांचा नागरिकांना लाभ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

अमरावती महापालिकेकडून वाढीव दराने कर आकारणी केली आहे. त्यामुळे तात्काळ सॉफ्टवेअरमध्ये दुरूस्ती करून नागरिकांना करपावत्या देण्यात याव्यात. कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश दिले.  सर्व घटकांचा विकास होण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्याचा भाग म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुलींना मोफत शिक्षण, बारावीनंतर विद्यावेतन, शेतकऱ्यांना मोफत वीज, दुधाला अनुदान, तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येत आहे.

 

सारथी, बार्टी सारख्या संस्था उभारून अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे. त्यासोबतच विभागीय स्तरावर चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधांचा खेळाडूंनी लाभ घ्यावा. खाशबा जाधव यांच्यानंतर यावर्षी राज्यातील खेळाडूने वैयक्तिक पदक प्राप्त केले आहे. खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाल्यास भविष्यात पदक मिळवणारे खेळाडू राज्यातून तयार होतील, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलासाठी निधी वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे या क्रीडा सुविधा प्राधान्याने उभ्या राहतील.

 

अमरावती येथील पाणी पुरवठ्याची अमृत योजना, सारथीचे विभागीय कार्यालय, वसतिगृह, अभ्यासिका, लालखडी रेल्वे उड्डाणपूल, चांगापूर फाटा रस्ता, विभागीय क्रीडा संकुल मैदानाचे भूमिपूजन तर जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यासोबतच वस्तू व सेवा कर इमारतीचे नुतनीकरण, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील क्रीडा सुविधा, उत्पादन शुल्कच्या इमारतीचे उद्घाटन, वडाळी उद्यान सौंदर्यीकरणाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच नगरोत्थान अभियानातील कामांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले.

क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी आभार मानले.

 

00000














                                          

















 

अमरावती, दि. 26 : अमरावती शहर आणि परिसराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. यातून शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होतील. एकाच दिवशी 1420 कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले आहे. ही कामे दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 

जिल्हा नियोजनच्या सभागृहात आज विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, मुख्य अभियंता गिरीश जोशी, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रुपा गिरासे आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, शासनाला उत्पन्न देणाऱ्या विभागांकडून मोठ्या प्रमाणावर कर गोळा करण्यात येत आहे. या विभागांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. विकासकामे करताना पुढील काळाचा विचार ठेवण्यात आला आहे. सारथी संस्थेमध्ये 300 आसन क्षमतेचे श्रोतागृह मंजूर आहे. मात्र याठिकाणी 500 विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय राहणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व सारथीच्या ठिकाणी आता 500 क्षमतेचे श्रोतागृह राहणार आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त निधीही देण्यात येणार आहे. एकाच दिवशी 1420 कोटी रूपयांच्या विविध कामांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले आहे. या सुविधांचा नागरिकांना लाभ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

अमरावती महापालिकेकडून वाढीव दराने कर आकारणी केली आहे. त्यामुळे तात्काळ सॉफ्टवेअरमध्ये दुरूस्ती करून नागरिकांना करपावत्या देण्यात याव्यात. कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश दिले.  सर्व घटकांचा विकास होण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्याचा भाग म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुलींना मोफत शिक्षण, बारावीनंतर विद्यावेतन, शेतकऱ्यांना मोफत वीज, दुधाला अनुदान, तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येत आहे.

 

सारथी, बार्टी सारख्या संस्था उभारून अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे. त्यासोबतच विभागीय स्तरावर चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधांचा खेळाडूंनी लाभ घ्यावा. खाशबा जाधव यांच्यानंतर यावर्षी राज्यातील खेळाडूने वैयक्तिक पदक प्राप्त केले आहे. खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाल्यास भविष्यात पदक मिळवणारे खेळाडू राज्यातून तयार होतील, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलासाठी निधी वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे या क्रीडा सुविधा प्राधान्याने उभ्या राहतील.

 

अमरावती येथील पाणी पुरवठ्याची अमृत योजना, सारथीचे विभागीय कार्यालय, वसतिगृह, अभ्यासिका, लालखडी रेल्वे उड्डाणपूल, चांगापूर फाटा रस्ता, विभागीय क्रीडा संकुल मैदानाचे भूमिपूजन तर जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यासोबतच वस्तू व सेवा कर इमारतीचे नुतनीकरण, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील क्रीडा सुविधा, उत्पादन शुल्कच्या इमारतीचे उद्घाटन, वडाळी उद्यान सौंदर्यीकरणाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच नगरोत्थान अभियानातील कामांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले.

क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी आभार मानले.

 

00000

जागतिक रेबीज दिनानिमित्त जनजागृती

 जागतिक रेबीज दिनानिमित्त जनजागृती


अमरावती, दि. 27 : जागतिक रेबीज दिन दि. 28 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. रेबीज दिनानिमित्त आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

नागरिकांना रेबीजबद्दल जागरूक करण्यासाठी आणि प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी रेबीज दिन साजरा करण्यात येतो. जागतिक रेबीज दिनाचा उद्देश मानव आणि प्राण्यांवर रेबीजच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढविणे, धोकादायक रोग रोखता येईल, याविषयी माहिती आणि सल्ला प्रदान करणे आणि रेबीज नियंत्रणातील वाढीव प्रयत्नांसाठी प्रयत्न करणे आहे.

रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी कुत्रा, ससा, माकड, मांजर चावल्यानंतर होतो. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास म्हणतात. रेबीज रोग झाल्यास प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175  दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात, त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात, त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि रेबीज झालेली कुत्री माणसांना चावल्यास हा रोग होतो. कुत्र्यांच्या लाळेद्वारे रोगाचा प्रसार होतो.

या रोगाची लक्षणे ही साधारणपणे 2 ते 12 आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची भिती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो. माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असे नाही. पण काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.

या आजारावर उपचार म्हणून चावल्याने जखम झाल्यावर लवकरात लवकर साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर ॲण्टीसेप्टीक मलम लावावे. त्वरीत जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीजवर पीईपी पोस्ट एक्‍स्पोजर प्रोफायलॅक्सिस ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती टोचून घेणे योग्य आहे. पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस 28 दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर घेतला पाहिजे. त्यानंतर 3 दिवस, 7 दिवस आणि 28 दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. आता पोटात घ्यायचे इंजेक्शन देण्याची गरज नसून दंडावर देण्याचे इंजेक्शन उपलब्ध आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

                                                         



000000



एमपीएससी परीक्षेत 'महाज्योती’च्या 151 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 एमपीएससी परीक्षेत 'महाज्योती’च्या 151 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 उपजिल्हाधिकारी पदाकरिता विनीत शिक्रेची निवड


                           मूल्याधिष्ठित शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर ही राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. महाज्योती मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षा पूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्याना देण्यात आले होते. दर्जेदार प्रशिक्षणाचीच फलश्रृती म्हणजे आज एमपीएससी परीक्षेमध्ये महाज्योतीचे 151 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यापैकी श्री. विनीत विक्रांत शिर्के यांची उपजिल्हाधिकारी या पदा करिता निवड झालेली आहे. इतर मागास वर्ग या प्रवर्गातून यांचा प्रथम क्रमांक आलेला असून राज्यात सातवा क्रमांक आलेला आहे. तसेच ओबीसी प्रर्वगात राज्यात मुलीमध्ये प्रथम पटकाविणाऱ्या वैष्णवी हरिभाऊ बावस्कार हिने घवघवीत यश प्राप्त केले. विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी दिली. या दोन्ही विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकाला तसेच महाज्योतीला दिले आहे.

                            महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी सांगितले की, महाज्योतीचे 151 विद्यार्थ्यांमध्ये 98 इतर मागास वर्ग, 49 विमुक्त जाती - जमाती तसेच 4 विशेष मागास प्रवर्गीय प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी श्री. विनीत विक्रांत शिर्के यांची उपजिल्हाधिकारी या पदाकरिता निवड झालेली. तसेच ओबीसी प्रर्वगात राज्यात मुलीमध्ये अव्वल क्रमांक वैष्णवी हरिभाऊ बावस्कार यांनी पटकाविला. स्पर्धा परीक्षा ही केवळ ज्ञानाची परीक्षा नसून यात अभ्यासात घेतलेली मेहनत, जिद्द, आणि चिकाटी तसेच तुमची शिस्त यांच्यातून मिळालेले फळ म्हणजेच विद्यार्थ्यांचे यश असते. प्राविण्यप्राप्त सर्व विद्यार्थ्यानचे मनपूर्वक अभिनंदन तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी दिल्या.

उत्तम दर्जाच्या प्रशिक्षणाची फलश्रृती
‘एमपीएससी’चा निकाल : मंत्री अतुल सावे

                           इतर मागास बहुजन कल्याण विभाग, तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर मा. ना. श्री. अतुल सावे मंत्री यांनी सांगितले की, महाज्येाती मार्फत देण्यात येणाऱ्या उत्तम दर्जाच्या प्रशिक्षणाची हा निकाल फलश्रृती आहे. दिवसेंदिवस महाज्योतीचे विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमध्ये घवघवीत यश मिळवित आहे. त्यामुळेच आज विनीत विक्रांत शिर्के आणि वैष्णवी हरिभाऊ बावस्कार या दोन्ही विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.


 महाज्योतीच्या विद्यावेतनातून मिळाली प्रशिक्षणास मदत : विनीत शिक्रे

                            मी विनीत शिक्रे कोल्हापूर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा 2023 परीक्षेतून माझी OBC प्रवर्गातून पहिल्या क्रमांकाने उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली आहे. मला महाज्योतीच्या योजनेचा विद्यावेतन व प्रशिक्षणाच्या माध्यमातून खूप फायदा झाला. आर्थिक भार कमी होऊन मी चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकलो तसेच माझ्या यशाचे श्रेय माझ्या पालकांनी वेळोवेळी दिलेला पाठिंबा व महाज्योती राभविलेले परीक्षा पूर्व प्रशिक्षण व अर्थसहाय्य यांना देतो.







                                                                 00000

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेबाबत विद्यार्थ्यांना आवाहन

 

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेबाबत विद्यार्थ्यांना आवाहन

 

अमरावती, दि. 25: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीकरीता जारी केलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सुचना (केंद्र हिस्सा निधी वितरण पद्धती) राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय नुसार  १७ मार्च, २०२२ नुसार लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक (अ) केंद्र शासनाच्या ६० टक्के च्या हिश्याचे वितरण पद्धती नमूद केलेली असून त्यानुसार भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती निधीचे वितरण विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवर नोदणीकृत केलेल्या अर्जानुसार आधार संलग्नीकृत बँक खात्यामध्ये केंद्र शासनाकडून थेट डी बी टी तत्वावर पी एफ एम एस प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येत आहे. सदर केंद्र हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांस अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरीत महाविद्यालयास देय असलेली रक्कम (शिक्षण शुल्क व इतर शुल्क) विद्यार्थ्यांने पुढील सात दिवसाच्या आत महाविद्यालयास जमा करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत महाविद्यालयांने त्यांच्याकडून विहित नमुन्यात हमीपत्र घ्यावे असे नमूद केलेले आहे. परंतू केंद्र शासनाचा ६० टक्के हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर सुद्धा महाविद्यालयास देय असलेली रक्कम काही विद्यार्थी महाविद्यालयास भरणा करत नसल्याबाबत विभागातील महाविद्यालय व शिक्षण संघटना यांचेकडून जिल्हा कार्यालयास व या कार्यालयास तक्रारी,निवेदन प्राप्त होत आहे.

शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीच्या ६० टक्के हिश्यापैकी महाविद्यालयास देय असलेली रक्कम महाविद्यालयाकडे दिलेल्या विहित जमा करणे विद्यार्थ्यांस बंधनकारक आहे. तरी केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा ६० टक्के हिस्सा ज्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी सात दिवसामध्ये महाविद्यालयास देय असलेली रक्कम महाविद्यालयाकडे भरणा करून त्याची रितसर पावती  महाविद्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन विभागातील विद्यार्थी व पालक यांना समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, यांनी  केले आहे.  

000000

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

‘स्वच्छता ही सेवा पंधरवड्या’चा विभागीय आयुक्तालयात शुभारंभ ; स्वच्छता हा जीवनशैलीचा मुलभूत सिद्धांत बनवा -उपायुक्त संजय पवार

 

‘स्वच्छता ही सेवा पंधरवड्या’चा विभागीय आयुक्तालयात शुभारंभ

स्वच्छता हा जीवनशैलीचा मुलभूत सिद्धांत बनवा

                         -उपायुक्त संजय पवार









 

अमरावती, दि. 17 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून, 2 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर हा कालावधी ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा म्हणून विभागात सर्वत्र राबविण्यात येणार असून मोहिमेचा आज विभागीय आयुक्तालयात शुभारंभ करण्यात आला. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी स्वच्छता हा केवळ सरकारी मोहिमेचा भाग नाही, तर तो नागरिकांच्या जीवनशैलीचा मुलभूत सिद्धांत बनला पाहिजे, असे प्रतिपादन महसूल उपायुक्त संजय पवार यांनी केले.

 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. उपायुक्त गजेंद्र बावणे, नगरपालिका प्रशासनचे सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, सहाय्यक आयुक्त गिता वंजारी, वैशाली पाथरे, तुकाराम टेकाडे, सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य शाखांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

 

            श्री. पवार म्हणाले की, स्वच्छतेबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करुन स्वच्छता हा जीवनशैलीचा भाग होण्यासाठी संपूर्ण देशभरात ‘स्वच्छ भारत मोहिम’ राबविण्यात येते. आजही अनेकांकडून अजाणतेपणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जाते. यासंबंधी अधिक गंभीर होवून स्वच्छता हा सवयीचा भाग होणे आवश्यक आहे. परदेशात तेथील जनता व सरकार स्वच्छतेसंबंधी अधिक सजग असून तसे नियमच त्या देशात तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील नद्या, सरोवर, रस्ते, परिसर, बाजारपेठा, नागरि वसाहती ह्या स्वच्छ व सुंदर आहेत. आपल्याकडेही त्याचप्रमाणे सार्वजनिक व घरेलू स्वच्छता होण्यासाठी तसे संस्कार व सवय स्वत:सह इतरांनी अंगिकारणे आवश्यक आहे. स्वच्छता ही सेवा या मोहिमेत सर्वांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेऊन मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी सांगितले.

 

            ‘स्वच्छता ही सेवा पंधरवड्या’बाबत श्री. मस्के यांनी यावेळी प्रास्ताविकातून माहिती दिली. वर्ष 2017 पासून स्वच्छतेच्या पंधरवड्याला सर्वत्र सुरुवात झाली आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ ही यावेळेची थीम असून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम या कालावधीत राबविण्यात येणार आहे. दि. 17 सप्टेंबर म्हणजे आजपासून या पंधरवड्याचा शुभारंभ होत आहे. प्लॉस्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन, कचऱ्याची विल्हेवाट करताना घ्यावयाची काळजी व त्याचा पुनर्वापर, सुर्याच्या अतीनिल किरणापासून बचाव होण्यासाठी कार्बनडायऑक्साईड वायूचे उत्सर्जन कमी करणे, ग्लोबल वार्मिंगबाबत जनजागृती करणे, टाकावू पासून टिकावू आदी महत्वपूर्ण घटकांसंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपले घर, कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी शंभर तास द्यावेत. तसेच संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा वसा कायमरित्या टिकवावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

             ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती श्रीमती वंजारी यांनी यावेळी दिली. या मोहिमे अंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत कार्यालय व परिसर स्वच्छ करावयाचे असून टाकावू पासून टिकावू या संकल्पनेवर आधारित कचऱ्यापासून विविध वस्तूंची निर्मिती करावयाची आहे. निर्माण केलेल्या वस्तूंचे 1 ऑक्टोबरला प्रदर्शन लावण्यात येणार असून त्यातील विजेत्यांना 2 ऑक्टोबरला पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. कापडी पिशव्यांच्या वापराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृतीसाठी ‘सेल्फी विथ थैला’ ही संकल्पना सुध्दा राबविण्यात येणार, अशी माहिती श्रीमती वंजारी यांनी यावेळी दिली.

 

            दररोज विभागीय आयुक्त कार्यालय व परिसर स्वच्छ करणाऱ्या महिला-पुरुष स्वच्छताकर्मींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव यावेळी करण्यात आला. दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करुन स्वच्छतेचा संकल्प पूर्ण करण्याबाबतची ‘स्वच्छतेची शपथ’ यावेळी उपस्थितांना देण्यात आली. या कार्यक्रमानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता करुन श्रमदान केले.

00000

 

 

 

 

प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अमरावती, दि. 17 : केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त संजय पवार यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

        यावेळी उपायुक्त गजेंद्र बावने, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, राहुल टेकाडे, सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

0000