शुक्रवार, ३१ मे, २०२४
बारावीच्या पुरवणी परिक्षेचे आवेदनपत्र 7 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्विकारणार
दहावीच्या पुरवणी परिक्षेचे आवेदनपत्र 31 मेपासून ऑनलाईन पद्धतीने स्विकारणार
बुधवार, २९ मे, २०२४
‘आंबा व मिलेट महोत्सवा’चा नागरिकांनी लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी सौरभ कटियार
लोकसेवा मिळविण्यासाठी अडचणी आल्यास आयोगाकडे दाद मागा -लोकसेवा हक्क आयुक्त डॉ. एन. रामबाबू
बुधवार, २२ मे, २०२४
मतमोजणीची कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सौरभ कटियार
मंगळवार, २१ मे, २०२४
कृषि विभागाच्या पुस्तिकेसाठी सुधारणा आमंत्रित
कृषि विभागाच्या पुस्तिकेसाठी सुधारणा आमंत्रित
“भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य, पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यास शिफारशी” या पुस्तिकेकरिता सुधारणा आमंत्रित
सुधारणा पाठविण्यासाठी ddinfor@gmail.com ई मेल उपलब्ध
अमरावती, दि. 21 : कृषी विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत “भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य, पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यास शिफारशी” ही पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे.
या पुस्तिकेमध्ये भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांच्या पेरणीपासून काढणी पर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन या विषयी माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तिकेच्या ड्रॉफ्टचा क्युआर कोड यासोबत देण्यात आला आहे.
शेतकरी, कृषी तज्ज्ञ तसेच नागरिकांना या पुस्तिकेमध्ये काही सुधारणा तसेच अतिरिक्त माहिती द्यावयाची असल्यास कृषी आयुक्तालयाच्या ddinfor@gmail.com या ई-मेलवर कळविण्यात यावी, असे कृषी आयुक्तालय पुणेचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
पाणी टंचाईच्या निवारणार्थ पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
पाणी टंचाईच्या निवारणार्थ
पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करा
* पाणी व चारा टंचाई, उष्माघातापासून बचावासाठी
उपाययोजनांबाबत घेतला आढावा
अमरावती, दि. ९ : दरवर्षी उन्हाच्या झळा वाढल्या की पाणी टंचाईची समस्या उद्भवते. यावर मात करण्यासाठी पाणी वाचविणे, पाण्याच्या स्त्रोतांचे पुनर्भरण तसेच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने विभागातील सर्व संबंधित यंत्रणांनी आपसात समन्वय राखून पाणी टंचाईच्या निवारणार्थ आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पाणी टंचाई, चारा टंचाई व उष्माघातापासून बचावासंबंधी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाबाबत डॉ. पाण्डेय यांनी आढावा घेतला. यावेळी उपायुक्त संजय पवार, नगरविकास विभागाचे उपायुक्त श्री. फडके, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के प्रत्यक्षरित्या तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.
डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पावसाचे पाणी साठवणे, पाण्याचे पुनर्भरण प्रयोग राबविणे, वनाच्छादित क्षेत्रात वाढ करणे आदी उपाययोजनांसह उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्यात करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या गावात पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे, त्याठिकाणी नियमितपणे टँकरने पाणी पुरवठा सुरु ठेवावा. महसूल व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने आवश्यकतेनुसार परिसरातील सर्व विहीरींचे अधिग्रहण करुन नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे. त्यासाठी सर्वप्रथम विहीरींच्या जलशुध्दीकरणाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. पाणी पिण्यायोग्य असल्याचे खात्री करुनच विहीरींचा पाणी पुरवठा करण्यात यावा. या कामात कुठलिही हयगय होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यातील चारा टंचाईच्या निवारणार्थ जनावरांच्या संख्येनुसार सद्यस्थितीत उपलब्ध चारा व पुढील दोन महिने चारा उपलब्ध होईल, यादृष्टीने आताच नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा सुरु असलेल्या गावांची संख्या, टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठ्यासाठीची एकूण टँकर्सची संख्या, संभाव्य टँकर्सची मागणी असलेली गावे, अधिग्रहीत विहीरींची संख्या, पाणी टंचाईच्या निवारणार्थ केलेल्या जिल्ह्यांनी केलेल्या उपाययोजना, जनावरांच्या पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, चारा टंचाईच्या अनुषंगाने नियोजन, धरणातील पाणी साठा, उपलब्ध पाणी साठा आदीबाबत विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेतला.
गत पाच दिवसांत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे. उष्णतेची लाट आगामी काही दिवसांत सुरु राहणार असल्याचे हवामान खात्याने वर्तविले आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. उष्माघाताच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी आरोग्य विभागाने त्यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा, तालुका रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात उपचार केंद्र स्थापित करावीत. त्यात रुग्णांसाठी बेड राखीव ठेवावे. उष्माघाताच्या रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा व औषधांची तजविज करुन ठेवावी. उष्माघातापासून बचाव व उपाययोजना यासंबंधी व्यापक जनजागृती करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी बैठकीत दिल्या.
0000
छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन
छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन
अमरावती, दि. 14 : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त संजय पवार, कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0000
आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे
- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
Ø जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवा
Ø मान्सून पूर्वतयारी आढावा
अमरावती, दि. 14 : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. बाधित गावांत तसेच दुर्गम गावांत तात्काळ मदत पोहोचण्याच्यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी सर्व स्तरावरील संपर्क यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून महसूल व संबंधित यंत्रणांनी नेहमी सतर्क राहावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाचे सभागृहात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी मान्सून पूर्व तयारीबाबत आज आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त संजय पवार, कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख आदी बैठकीला उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्वतयारी आपापल्या जिल्ह्यात करुन ठेवावी. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने बाधितांसाठी उंच ठिकाणी निवारा, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधसाठा आदी सामुग्रींची तजवीज आधीच करून ठेवावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. अवकाळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने प्रभावी नियोजन करावे. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष 24×7 नेहमी कार्यान्वित ठेवावीत. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावी. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात.
त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. ब्रिटीशकालीन तलावांच्या नियंत्रणाबाबत जिल्हा परिषद प्रशासन व जलसंधारण विभागाने जाणीवपूर्वक कार्यवाही करावी. नदी खोलीकरण व पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्याव्यात. शहरातील नाल्यांचे सफाई आदी कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण व शिकस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी. धरणातील जलसाठ्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे. तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. धरणातील पाणी सोडताना तहसीलदार, पोलीस व कंट्रोलरूमला 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी. हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.
जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, विज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हाप्रमुखांनी आताच करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी, जिल्ह्यातील मुख्य नद्या व नदीकाठावरील गावे, पूराचा धोका असणारी गावे, हवामानाचा अंदाज वर्तविणारी केंद्र, शोध व बचाव पथके, कुशल मनुष्यबळ, प्रथमोपचार किट, औषधींचा साठा, जिल्हा नियंत्रण कक्ष, पूर नियंत्रण यंत्रणा, प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग, बांधितांसाठी अन्न, भोजन, निवारा, औषधींचा साठा आदी बाबींसंदर्भात डॉ. पाण्डेय यांनी सविस्तर आढावा घेतला. तसेच आगामी खरिप हंगामाबाबत व मान्सूनपूर्व तयारी संबंधी कृषी विभागाने केलेले नियोजन याबाबतही त्यांनी आढावा बैठकीत घेतला.
नैसर्गिक आपत्ती काळातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक
* राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक(NDRF), पुणे - 02114-231509
* आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुंबई - 22-22025274/022-22837259
* नियंत्रण कक्ष, मंत्रालय, मुंबई - 022-22027990/022-22026712
* राज्य राखीव पोलीस दल, नागपूर - 0712-2564973-2560543
* नियंत्रण कक्ष पोलीस विभाग - 100
* विभागीय आपत्ती व्यवस्थापन, अमरावती - 0721-2661364/मो. न.9860011324
* जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती - 0721-2662025
* आपत्कालीन टोल फ्री क्रमांक - 1077
* अग्निशामक विभाग (मनपा) - 101, 0721-2576423
000000
सोमवार, २० मे, २०२४
आज जाहीर होणार बारावीचा निकाल
आज जाहीर होणार बारावीचा निकाल
विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपासून निकाल ऑनलाईन पाहता येईल
अमरावती, दि. 20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (21 मे) जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपासून निकाल ऑनलाइन पाहता येईल, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
इथे पाहता येईल निकाल :
बारावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाने पुढीलप्रमाणे अधिकृत संकेतस्थळ दिले आहे.
mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org, www.mahahsscboard.in, https://results.digilocker.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
ऑनलाइन निकालानंतर बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.
परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमून्यात, विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी-मार्च 2025) श्रेणीसुधार/गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना 27 मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज भरता येईल. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे राज्य मंडळाने दिली आहे.
0000








