गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा


अमरावतीत 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान
    दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

Ø  राज्यभरातील 3 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी

अमरावती, दि.31 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय, क्रिडा संचालनालय आणि मासोदची सत्यशोधक बहुउद्येशिय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रिडा संकुल येथे करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभ 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 1.00 वाजता असून स्पर्धेचा समारोप दि. 3 फेब्रुवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. समारोप समारंभात स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या दिव्यांग मुला-मुलींचे यथोचित कौतुक व पारितोषिक वितरण होणार आहे.
 या क्रीडा स्पर्धेमध्ये दृष्टीबाधित(अंध), मतीमंद, मुकबधीर, अस्थिव्यंग व बहुविकलांग प्रकारातील राज्यातील तीन हजाराहून अधिक विद्यार्थी विविध खेळ प्रकारामध्ये सहभागी होत आहे. या स्पर्धेमध्ये लांब उडी, उंच, गोळाफेक, बुध्दीबळ, धावणे, पोहणे, व्हिलचेअर रेसिंग, पासिंग द बॉल इत्यादी प्रकारचे विविध खेळात सर्व दिव्यांग प्रवर्गातील खेडाळु आपले कौशल्य प्रदर्शित करणार आहेत. अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते दि. 1 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 1.00 वाजता होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उद्योग, खनिकर्म, पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचेसह  कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. सुनील देशमुख, शिक्षण हक्क परिषदचे उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. श्रीकांत देशपांडे, महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री विरेंद्र जगताप, ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू, रमेश बुंदिले, डॉ. अनिल बोंडे, प्रभुदास भिलावेकर, रवि राणा, श्रीमती यशोमती ठाकुर उपस्थित राहणार आहेत.
विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा खत्री, मनपा आयुक्त संजय निपाणे, क्रिडा व युवक सेवा उपसंचालक श्रीमती प्रतिभा देशमुख, सत्यशोधक बहुउद्येशिय शिक्षण संस्था, मासोदच्या (चांदुरबाजार) अध्यक्षा सौ. नयना कडू आदींचे या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकरीता विशेष सहयोग मिळाला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे व अपंग कल्याण आयुक्तालय पुणेचे आयुक्त बालाजी मंजुळे यांच्या मार्गदर्शनात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती येथे प्रथमत: आयोजित दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी क्रीडा स्पर्धेला तसेच सायंकाळी 6.00 आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे यांनी केले आहे.
00000

बुधवार, ३० जानेवारी, २०१९

आरोग्य विभागात पदभरतीसह आमुलाग्र बदल - सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे


आरोग्य विभागात पदभरतीसह आमुलाग्र बदल
                                        - सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे

अमरावती, दि.30 : राज्याची सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होण्यासाठी रिक्त पदांच्या भरतीसह विविध आमुलाग्र बदल करण्यात येत आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
खासदार आनंदराव अडसूळ यांच्या पुढाकाराने डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना श्री. शिंदे बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार कॅ. अभिजित अडसूळ, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, पदाधिकारी जयंत डेहणकर, शिवराय कुलकर्णी, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, डॉ. पारीख, किरण पातुरकर आदी यावेळी उपस्थित होते.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा सक्षमपणे पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील एएसआय मानांकन प्राप्त रुग्णालयांची श्रेणीवाढ होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सोळाशे कोटीचा निधी मिळवून देण्यासाठी राज्य शासन पाठपुरावा करत आहे. आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजूंना शस्त्रक्रियेसाठी मदत होत आहे. अतिदुर्गम भागात बाईक ॲन्बूलन्सच्या सहाय्याने रुग्णांना उपचार होत आहेत. गरीब रुग्णांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याकरीता राज्यात बाळासाहेब ठाकरे मदत कक्ष उभारण्यात आले आहेत. मेळघाटातील कुपोषण निमुर्लनासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
विभागातील डॉक्टर, नर्सेस व आशा वर्करच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करू. येत्या काळात विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू. महाआरोग्य शिबिरे औषधे देण्यापुरतीच मर्यादित राहणार नसून गरजू रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात येणार आहे.   







 
श्री. शिंदे पुढे म्हणाले की, गरीब व वंचित घटकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार श्री. अडसूळ यांनी सामाजिक बांधिलकीतून शिबिराचे अतिशय नेटके नियोजन केले आहे. यापुढेही दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यतेसाठी तसेच त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी दिव्यांग सहायता शिबिराचे आयोजनही जिल्ह्यात होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
                        शेवटच्या घटकाला लाभ मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन - पालकमंत्री
पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात महाआरोग्य शिबिराची आवश्यकता होती. ती गरज खा. अडसूळ यांच्या पुढाकाराने शिबिराच्या आयोजनातून पूर्ण झाली आहे. शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी येत्या काळात दर तीन महिन्याला एक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा शासनाचा मानस आहे.    
टेलीमेडिसीन उपक्रमाद्वारे मेळघाटातील दुर्गम भागातील रुग्णांना मोठ्या शहरातील डॉक्टरांकडून उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.  शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलद्वारे आतापर्यंत पाच रुग्णांवर यशस्वीरित्या मुत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आहे, असेही श्री. पोटे पाटील यांनी यावेळी सांगितले.
खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले की, केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून आरोग्य शिबिराचे जिल्ह्यात पाच ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. भातकुली, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, सेमाडोह या शिबिराच्या ठिकाणी तीन हजारावर रुग्णांना आरोग्य सुविधांचा लाभ दिला आहे. यामध्ये ह्दयरोग तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया व इतर आजार असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर चांगल्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अंध, अपंग व दिव्यांगांची दखल घेवून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी गरजू रुग्णांसाठी कर्णयंत्र, चष्मे, जयपुर फुट, तीनचाकी वाहन, अंध व्यक्तींसाठी काठी यासह विविध सहाय्यभूत ठरणारी साहित्य वितरीत करण्यात येणार आहे.
     श्री. अडसूळ पुढे म्हणाले की, आतापर्यंत जिल्ह्यातील पाच हजारांवर चष्म्यांचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता गरजू रुग्णांवर उपचार करण्यासाठी न्यूरोलॉजिस्ट तज्ञाची जिल्ह्याला आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
 या महाआरोग्य शिबिरात 25 विविध आजाराशी निगडीत स्टॉल उभारण्यात आले होते. मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण स्टॉलला नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता.  शिबिर 31 जानेवारी सायंकाळपर्यंत सुरु राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

000000
.

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

इयत्ता 10 वीच्या परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध


इयत्ता 10 वीच्या परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध
Ø  www.mahahsscboard.in संकेतस्थळ

अमरावती, दि.17 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्यांध्यापक शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येत की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा मार्च 2019 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
सर्व माध्यमिक शाळांना मार्च 2019 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in अथवा www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बुधवार दि. 30 जानेवारी, 2019 पासून School Login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध करुन घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की, मार्च 2019 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व शाळांनी इ.10 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करावयाची आहे.
तरी मार्च 2019 मध्ये माध्यमिक प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असे पुणे, राज्य मंडळाचे सचिव, डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
000000

सोमवार, २८ जानेवारी, २०१९

तंत्रशिक्षण विभागीय क्रिडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन


तंत्रशिक्षण विभागीय क्रिडा

महोत्सवाचे थाटात उद्घाटन

अमरावती दि.28 : सहसंचालक, तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, अमरावती यांचेवतीने दि 18 व 19 जानेवारी रोजी अमरावती विभागातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनांमधील अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होतेक्रिडा महोत्सवादरम्यान पुरुष व महीला स्पर्धकांसाठी क्रिकेट,व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, बुदिधबळ व कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
क्रिडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शासकीय तंत्रनिकेतन, अमरावतीच्या भव्य सभागृहात संपन्न झाला. क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन सहसंचालक, (तंत्रशिक्षण) डॉ.डी.व्ही.जाधव यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी  उद्बोधन करतांना सहसंचालक डॉ. जाधव यांनी क्रिडा महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व पुरुष व महीला स्पर्धकांचे अभिनंदन करुन त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. जय पराजय महत्वाचा नसुन क्रिडा महोत्सवामुळे खिलाडू वृत्ती व सांघिक भावना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वृद्धिंगत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. पी. मोगरे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. आ.पी.मोगरे अमरावती यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधुन तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, अमरावती यांच्या नुतनीकरण केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटनही डॉ. डी. व्ही. जाधव यांचे हस्ते करण्यात आले व संकेतस्थळाचे नुतनीकरण करण्यासाठी भरीव योगदान देणार शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ येथील प्रा. येन्डे यांचा सत्कार सहसंचालकांचे हस्ते करण्यात आला.
विभागीय एन. बी. ए. नामांकन प्राप्त करणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथील संबंधित विभागांचे विभागप्रमुख सर्वश्री प्रा. एस. पी. पासेबंद, डॉ. एस. पी. बाजड, प्रा. डी. आर. गावंडे व एन. बी. ए. समन्वयक डॉ. एन. जी. कुळकर्णी तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथील संबंधित विभागांचे विभागप्रमुख सर्वश्री प्रा. यु. एम. थोरकर व प्रा. ए. एम. महल्ले व एन. बी. ए. समन्वयक डॉ. एस. पी. ताटेवार यांचा सहसंचालकांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व स्पर्धकांना क्रिडा प्रतिज्ञा प्रा. आर. के. परघणे यांनी दिली. व्यासपिठावर अमरावती विभागातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनांचे प्राचार्य उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याचे संचलन प्रा. श्रीकांत काळीकर यांनी केले तर आभारप्रदर्शन सहाय्यक संचालक डॉ. एम. ए. अली यांनी केले. सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांचे हस्ते बुध्दिबळ खेळून स्पर्धेचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले. क्रिडा स्पर्धा शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आल्या होत्या.
क्रिडा स्पर्धामध्ये शासकीय तंत्रनिकेतन, वाशिमच्या चमुने पुरुष क्रिकेट, पुरुष टेबल टेनिस व पुरुष बुध्दिबळ या स्पर्धामध्ये विजेतेपद प्राप्त केले. शासकीय तंत्रनिकेतन, अमरावतीच्या चमुने महीला क्रिकेट व महीला व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद तर पुरुष कॅरम स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीची चमु पुरुष व्हॉलीबॉल, पुरुष टेबल टेनिस व महीला टेबल टेनिस स्पर्धामध्ये उपविजेती ठरली. शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळच्या चमुने महीला टेबल टेनिस व महिला  बुध्दीबळ, महिला कॅरम व पुरुष कॅरम स्पर्धेत विजेतेपद तर महिला कॅरम स्पर्धेत उपविजेते प्राप्त केले. शासकीय तंत्रनिकेतन, मुर्तीजापूरची चमु पुरुष क्रिकेट स्पर्धेत उपविजेती ठरली तर शासकीय तंत्रनिकेतन,अचलपूरचे पुरुष बुध्दिबळ स्पर्धेमध्ये उपविजेते प्राप्त केले. शासकीय औषनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या चमुने महिला बुध्दिबळ स्पर्धेमध्ये उपविजेते प्राप्त केले.
अशाप्रकारे विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाने अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी क्रिडा महोत्सवाचे आयोजन करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रिडा गुणांना प्रोत्साहन देण्यात पुढाकार घेतल्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी आनंद व्यक्त करीत आहेत.
  
****












शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९



विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदन

अमरावती दि.26 : विभागीय आयुक्त कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आज सकाळी ध्वजवंदन केले. यावेळी उपायुक्त (महसूल) गजेंद्र बावने, उपायुक्त (पुरवठा) रमेश मावसकर, उपायुक्त (पुनर्वसन) प्रमोद देशमुख तसेच अन्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अमरावती पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.  

-----

राष्ट्रीय नमुना पाहणी अंतर्गत 77 वी फेरी



राष्ट्रीय नमुना पाहणी अंतर्गत 77 वी फेरी
Ø  नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे
             
        अमरावती, दि. 25 : राष्ट्रीय नमुना पाहणी अंतर्गत केंद्र व राज्य शासनाद्वारे संपूर्ण देशात विविध विषयावर नियोजनात्मक माहिती व आकडेवारीचे संकलन करण्यात येत आहे. या पाहणीसाठी नागरिकांनी योग्य माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन 2019 या वर्षांमध्ये (जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019) या कालावधीत राष्ट्रीय नमुना पाहणी ची 77 वी फेरी अंतर्गत राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभागातर्फे ग्रामीण व नागरी भागातील कुटुंबाची जमीन, पशुधारणा व शेतकरी कुटुंबाच्या परिस्थिीतीचे मुल्याकंन, तसेच कुटुंबाकडे त्यांनी केलेली गुंतवणूक, त्यांच्यावर असलेले कर्ज, स्थावर मालमत्ता आदि दायित्वाबाबत तपशीलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे. या पाहणीत आढळणाऱ्या या निष्कर्षांचा उपयोग शेती व शेतकऱ्यांसाठी भविष्यात राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर विविध धोरणे व कार्यक्रम आखण्यासाठी होणार आहे. करीता विभागातील सर्व नागरिकांनी पाहणीसाठी आणि माहिती संकलनासाठी येणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, राज्य शासनाच्या अधिकारी- कर्मचारी यांना सहकार्य करुन आवश्यक ती माहिती देण्याचे आवाहन, सहसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, अमरावती यांनी केले आहे.
                                                                          ***

गुरुवार, २४ जानेवारी, २०१९

शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे नि:शुल्क रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर प्रशिक्षणाचे आयोजन


शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे नि:शुल्क रेफ्रिजरेशन
ॲण्ड एअर कंडिशनर प्रशिक्षणाचे आयोजन

अमरावती, दि. 25 : भारत सरकार पुरस्कृत कौशल्य विकास व उद्योजक्ता विकास मंत्रालय, केंद्रिय प्रशिक्षण संचालनालय, अंतर्गत कम्यूनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलिटेक्निक योजना ही शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे राबविण्यात येते. या अनुषंगाने स्वंयरोजगारासाठी उपयुक्त तांत्रीक कौशल्यावर आधारीत रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर सहा महिने कालावधीचे नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन या संस्थेत करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षण ग्रामिण अल्प शिक्षित युवक व युवतीसाठी असून प्रशिक्षणासाठी वयाची अट नाही. सदर प्रशिक्षणसाठी अर्ज योजनेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. मुलाखत पध्दतीने प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल. विस्तृत माहितीसाठी कम्यूनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्न्कि योजना कार्यालय, मुलीचे वसतीगृह समोर,शासकीय तंत्रनिकेतन परीसर गाडगे नगर, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच प्राचार्य डॉ. आर.पी. मोगरे व योजनेचे समन्वयक प्रा. एस.जे. गायकवाड यांनी केले आहे.
                                                                                        ****

शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे नि:शुल्क मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षणाचे आयोजन


शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे नि:शुल्क मोबाईल
रिपेअरिंग प्रशिक्षणाचे आयोजन

अमरावती, दि. 23 : भारत सरकार पुरस्कृत कौशल्य विकास व उद्योजक्ता विकास मंत्रालय, केंद्रिय प्रशिक्षण संचालनालय, अंतर्गत कम्यूनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलिटेक्निक योजना ही शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे राबविण्यात येते. या अनुषंगाने स्वंयरोजगारासाठी उपयुक्त तांत्रीक कौशल्यावर आधारीत मोबाईल रिपेअरिंग तिन महिने कालावधीचे नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन या संस्थेत करण्यात येते.
सदर प्रशिक्षण ग्रामिण अल्पशिक्षित युवक व युवतीसाठी असून प्रशिक्षणासाठी वयाची अट नाही. सदर प्रशिक्षणसाठी अर्ज योजनेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. मुलाखत पध्दतीने प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल. विस्तृत माहितीसाठी कम्यूनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्न्कि योजना कार्यालय, मुलीचे वसतीगृह समोर,शासकीय तंत्रनिकेतन परीसर गाडगे नगर, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.पी. मोगरे व योजनेचे समन्वयक प्रा. एस.जे. गायकवाड यांनी केले आहे.
                                                                                        ****

बुधवार, २३ जानेवारी, २०१९

सफाई कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी श्रमसाफल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा - दिलीप हाथीबेड





राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड
यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

सफाई कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी
श्रमसाफल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा
- दिलीप हाथीबेड

अमरावती, दि. 22 : सफाई कामगारांना त्यांच्या हक्काची घरे मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी आज दिले.
सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक जीवनाबाबत अध्ययन तसेच पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार योजना याविषयी बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मनपा आयुक्त संजय निपाणे, सहा. आयुक्त श्री. सुरंजे यांचेसह नगरपालिकांचे मुख्याधिकारी व सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. हाथीबेड म्हणाले, सन 1986, 1987 व 1988 साली निघालेल्या शासन परिपत्रकात नमूद असल्यानुसार सफाई कामगारांना त्यांच्या मालकीची हक्काची घरे मिळण्यासाठी तरतूद केलेली आहे. परंतू नगरविकास प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, याकडे त्यांनी चर्चेच्या माध्यमातून विशेष लक्ष वेधले.       25 वर्षे सातत्याने स्वच्छता कर्मचारी म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून शासकीय जमीनीवर घरे बांधून देण्यात येतात. या योजने संदर्भात त्यांनी महापालिका, नगरपालिका निहाय प्रगती जाणून घेतली. तसेच या योजनेच्या अमंलबजावणीसंदर्भात अडचणी समजावून घेतल्या. स्वच्छता कर्मचारी समाजासाठी स्वच्छता सैनिक म्हणून काम करीत असतो. अशा स्वच्छता सैनिकांसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी योजनांची प्रामाणिकपणे व प्रभावीपणे अमंलबजावणी करावी. त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी योजनांचा लाभ देऊन घरकुल उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश श्री. हाथीबेड यांनी यावेळी दिले.
लाड पागे समितीची अमंलबजावणी देशभरात करण्यात यावी. सफाई काम हे वर्षभर चालणारे अत्यावश्यक सेवा असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सफाई कामात ठेकेदार प्रथा बंद झाली पाहिजे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेचा लाभ देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेतील महानगरपालिका तसेच नगरपालिकानिहाय माहिती त्यांनी माहिती घेतली. लाडपागे समितीने स्वच्छता कामगारांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी केलेल्या शिफारशींची अमंलबजावणी करण्यासाठी नगरविकास विभागाने स्वच्छता कामगारांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पाल्यांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. स्वच्छता कर्मचाऱ्यांना ठेकेदारी पध्दतीने करावयाची स्वच्छता कामे बंद करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे श्री. हाथीबेड यांनी सांगितले.
बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. रोजगाराची समस्या मोठी असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुलांनी केंद्र सरकार व राज्य शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा व संधीचा फायदा घ्यावा. स्व्च्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना स्वच्छता किट व गणवेश पुरविण्यात यावे. तसेच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र आरोग्य विमा योजना सुध्दा कार्यान्वित करण्यात यावी, अशा सूचना श्री. हाथीबेड यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिल्या.
000000




अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री गिरिष बापट यांचे हस्ते लोह व आयोडिन युक्त मीठाचे वितरण


अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक  मंत्री गिरिष बापट यांचे हस्ते
लोह व आयोडिन युक्त मीठाचे वितरण
अमरावती, दि. 23 : अमरावती शहरातील शिद्यापत्रिकाधारकांना लोह व आयोडीन युक्त मीठ टाटा ट्रस्टच्या सहाय्याने रास्त भाव दुकानातून वितरीत करण्याबाबत दि. 5 ऑक्टोंबर च्या शासन नियमानुसार निर्देश देण्यात सूचित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने दि. 21 जानेवारी रोजी सांयकाळी शहरातील मालटेकडी रोड स्थित अग्रवाल रास्त भाव दुकान परिसरात अन्न,नागरी पुरवठा विभाग व टाटाट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लोह व आयोडीन मीठाचे वितरण समारंभ आयोजि करण्यात आला होता.
या वितरण समारंभांत शिद्यापत्रिकाधारंकांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरिष बापट यांचे हस्ते लोह व आयोडीन युक्त मीठाचे वाटप करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार डॉ. सुनील देशमुख, पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, निरिक्षण अधिकारी संजय आवरे, खरेदी अधिकारी उमेश खोडके आदी उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले की, शिधापत्रिकाधारकांना लोह व आयोडिन युक्त मीठ रास्त भाव दुकानामधुन वितरीत करण्यात येत आहे. शहरातील रास्तभाव दुकानदाराकडुन हे मीठ 14 रुपये प्रती किलो प्रमाणे शिधापत्रिकाधारकांना व नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. सर्व लाभार्थी व नागरीकांना सदर मीठाचा वापर आपल्या दैनंदिन आहारात केल्याने आरोग्य अधिक चांगले राहील. तसेच विशेषत, स्त्रियांनी या मीठाचा दैनदिन आहारात वापर करावे, असे आवाहनही श्री. बापट यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला शहरातील नागरीक, रास्तभाव दुकानदार, लाभार्थी, अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
0000000
.

गुलाबराव महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा मिळाली


गुलाबराव महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा मिळाली

            - गिरीश बापट
Ø  विश्व अध्यात्म विज्ञान केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण
अमरावतीदि. २१ : संत श्री गुलाबराव महाराजांनी १३४ पुस्तके लिहिली आहेत. दृष्टी नसूनही त्यांचे विचार जगातील विचारांचे समन्वय साधणारे आहे. आज त्यांच्या भूमीत येऊन विचाराची प्रेरणा मिळाली आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केले.
चांदूर बाजार येथील संत गुलाबराव महाराज सेवा संस्था येथे आयोजित विश्व अध्यात्म विज्ञान केंद्रभक्तिधाम विकास आराखड्यातील कामांचा भूमीपूजन आणि स्वच्छतेचा जागर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बच्चू कडूउन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष डॉ. विजय भटकरसंस्थेचे अध्यक्ष मनोहर किरक्कटेडॉ. अर्चना बारब्दे उपस्थित होते.
श्री. बापट म्हणालेगुलाबराव महाराजांच्या चरित्राचा माझ्यावर प्रभाव राहिला आहे. त्यांच्या अलौकिक विचारांचा प्रभाव जागतिक पातळीवर आहे. एक समन्वयी विचार म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यांना दिसत नसूनही त्यांनी समन्वयी विचार मांडून दृष्टी असल्याचे दाखवून दिले. त्यांचे विचार जगभरात जाण्यासाठी संस्थेने त्यांचे मंदिर ज्ञान केंद्र होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेतही प्रशंसनीय बाब आहे. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ज्ञानकेंद्रात येणारा प्रत्येक जण महाराजांचे विचार शिकून जाईलत्याच्या जीवनात क्रांती घडून येईल.
महाराजांचे विचार पोहचविण्यासाठी पंढरपूर येथे जागा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पुणे येथील जागेबाबत लवकरच निर्णय होणार आहे. कायमस्वरूपी जागा मिळाल्यामुळे महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे ही आपल्यावरील जबाबदारी आहे. महाराजांनी सर्वसामान्यांच्या विकासाची जी जाण ठेवली आहेत्या दृष्टीने कार्य करण्यात येणार असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले.
महाराजांचे विचार सर्व विचारांचे समन्वय साधणारे
जगात विविध विचारधारा आहेत. या सर्व विचारांचे समन्वय साधणारे विचार हे गुलाबराव महाराजांचे विचार आहेत, असे मत डॉ. भटकर यांनी व्यक्त केले.
भौतिक सुखाची पातळी गाठल्यानंतर मनुष्य आध्यात्मिक सुखाकडे वळतो. त्यामुळे येत्या काळात आध्यात्मिक आधिष्ठान असलेल्या भारताकडे जग आशेने पाहणार आहे. सर्व विचारधारांचा समन्वय साधणे हे केवळ महाराजांच्या विचारात असल्याने तत्त्वज्ञान समजावून घेण्यासाठी जगभरातील अभ्यासक या ठिकाणी येतील. त्या दृष्टीकोनातून या ठिकाणी वाङमय केंद्राची निर्मिती होणार आहे. महाराजांनी 14 हजार पानांमधून समन्वयाचे तत्वज्ञान मांडले. म्हणूनच त्यांना समन्वय ऋषी म्हटल्या जाते. या ऋषी आणि कृषी संस्कृती असलेल्या देशात कृषीवर आधारीत उद्योग सुरू होऊन यातून रोजगार निर्माण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार बच्चू कडू यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य रविंद्र देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री. बापट यांनी विश्व अध्यात्म विज्ञान केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण करून भक्तिधाम विकास आराखड्यातील कामांचे भूमीपूजन केले.









  जिल्हा वार्षिक नियोजनाबाबत विभागस्तरीय बैठकीत चर्चा

आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा व रोजगाराला प्राधान्य
-         वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

अमरावती, दि.21 आरोग्य, शिक्षण, रोजगार व पाणी या मुलभूत गरजांना प्राधान्य देऊन त्यानुसार वार्षिक नियोजन तयार करावे. त्यासाठी पुरेसा निधी देऊ, तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित रोजगाराच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा योजनेत समावेश करावा, असे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिले.
अमरावतीसह विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक नियोजनाची बैठक वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार रामदास तडस, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जिल्ह्यांनी रोजगार या विषयासाठी स्वतंत्र नियोजन करावे. मत्स्यव्यवसाय, दुग्धोत्पादन, कृषीआधारित व्यवसाय आदींचा विकास व स्थानिक रोजगारनिर्मितीच्या शक्यता असल्यास त्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही. मानव विकास योजनेत समाविष्ट गावांत अंगणवाड्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करावे. मोझरी विकास आराखड्यानुसार मंजूर झालेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी. चिखलद-यात सिडकोतर्फे विकास आराखड्याची  600 कोटी रुपयांची कामे तातडीने पूर्ण करावी.

                मेळघाटातील सर्व रस्ते तीन वर्षांत पूर्ण करणार
मेळघाटात वनविभागाकडून कुठलीही हरकत नसलेल्या सर्व रस्त्यांची यादी सादर करावी. त्यासाठी 300 कोटी रुपये निधी देऊ. पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपये निधी देऊ. येत्या तीन वर्षांत मेळघाटातील सर्व रस्ते पूर्ण करण्यात येतील, असेही यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. आरोग्याच्या सुविधांसाठी पुरेसा निधी देऊ. त्यामुळे नागरी भागातील रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्रा. आ. केंद्रे यासाठी निश्चित निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
                        अमरावतीत आरोग्य व रस्तेविकासाला प्राधान्य
अमरावती जिल्ह्यात 212 कोटी रुपयांच्या मूळ आराखड्यानुसार 103 कोटी 95 लाख रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली. पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक शाळा, रुग्णालये, पांदणरस्ते यासाठी ही मागणी असल्याचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितले.
श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चिखलदरा व धारणी तालुक्यातील अंगणवाड्यांबाबत तत्काळ प्रस्ताव द्यावेत. संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेंडगाव विकासासाठी 18.75 कोटी निधीची तरतूद करण्यात येईल. ग्रामीण रस्ते विकासासाठी विशेष बाब म्हणून 5 कोटी रुपये देण्यात येतील. अंजनगाव सुर्जी येथे 50 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयासाठी निधी देऊ. त्याचप्रमाणे, पथ्रोट, चाकर्दा व टिटंबा येथील प्रा. आ. केंद्रांच्या बांधकामासाठी निधी देण्यात येईल. धामक येथील आरोग्य केंद्राला 2 कोटी देण्यात येतील.
मत्स्यसंवर्धन केंद्रासाठीचा 20 कोटी निधी अद्यापही अखर्चित आहे. या केंद्रनिर्मितीसाठी तत्काळ कार्यवाही करावी, तसेच आयएएस-आयपीएस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या स्वतंत्र इमारतीसाठी कार्यवाही व्हावी, असे निर्देश वित्तमंत्र्यांनी यावेळी दिले.   
                                    ऐतिहासिक वास्तु संवर्धनासाठी निधी
ऐतिहासिक वास्तु संवर्धनासाठी जिल्ह्याने प्रस्ताव द्यावा. त्यासाठी निश्चित निधी मिळवून देण्यात येईल, असे वित्त राज्यमंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, शाळांच्या इमारती चांगल्या व भक्कम असाव्यात. त्यासाठी ज्या ज्या ज्या शाळांच्या इमारती जीर्ण किंवा नादुरुस्त अवस्थेत आहेत, त्यांची यादी करावी. या शाळांच्या बांधकामासाठी  पुरेसा निधी देण्यात येईल.  
                                                यवतमाळात 100 खाटांचे रुग्णालय
यवतमाळ जिल्ह्यात खनिज विकास निधीतून आरोग्य, पाणी व शाळांसाठी खर्च करावा. शेतीशी संबंधित रोजगार निर्मितीवर भर द्यावा. यवतमाळ येथील 100 खाटांच्या रुग्णालयासाठी पुरेसा निधी देऊ, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.
                                                बुलडाणा जिल्ह्यात महिला रुग्णालयाला निधी
बुलडाणा जिल्ह्यातील प्रस्तावानुसार प्राथमिक शाळांसाठी 15 कोटी, अंगणवाडी, शासकीय इमारतीसाठी 3 कोटी व महिला रुग्णालयासाठी 1.5 कोटी, तसेच विविध ठिकाणी सीसीटीव्हीसाठी निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.  
                                                वाशिम जिल्ह्यात पशुसंवर्धनाला प्रोत्साहन
वाशिम जिल्ह्यात ग्रामपंचायत भवनासाठी 7 कोटी 68 लक्ष, जलयुक्त शिवार योजना इंधन खर्चासाठी 10 कोटी रुपये देण्यात येतील. गोवंशवृद्धीसाठी कृत्रिम रेतन केंद्राचा प्रस्तावही मान्य करण्यात आला. त्यासाठी निधी देऊ, तसेच वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी तारेचे कुंपण उभारण्यासाठी निधी वनविभागाकडून देण्यात यावा, असेही ते म्हणाले.
                                                अकोल्यात कर्करोग उपचार रुग्णालयाला निधी देऊ
अकोला जिल्ह्यात शेतक-यांना अनुदान तत्वावर ट्रॅक्टरवाटपासाठी 15 कोटी, प्राथमिक शाळांसाठी 4 कोटी 5 लाख रुपये, पोलीस निवासस्थाने विकास, विमानतळ विकास आणि कारागृहे, ग्रामीण भागातील मोक्याची ठिकाणे येथे सीसीटीव्ही बसविण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. 64 गावे अंभोरा धरण प्रकल्पासाठी निधी देऊ, असे ते म्हणाले.  अकोल्यात कर्करोग उपचार रुग्णालय व 100 खाटांच्या रुग्णालयासाठी निधी मिळवून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
आमदार सर्वश्री डॉ. सुनील देशमुख, डॉ. अनिल बोंडे,  वीरेंद्र जगताप, रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, राजेंद्र पाटणी, प्रा. अशोक उईके यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील वाढीव मागण्यांवर यावेळी विचारविनिमय झाला.








                  

शनिवार, १९ जानेवारी, २०१९

इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे वाढीव गुणांच्या प्रस्तावास मूदतवाढ


इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे वाढीव
गुणांच्या प्रस्तावास मूदतवाढ
Ø  अंतीम मूदत 25 जानेवारी
अमरावती, दि.19: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की, शासन निर्णय दि. 24 डिसेंबर, 2017 नुसार शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याचे प्रस्ताव विभागीय मंडळांकडे सादर करण्याची अंतिम मुदत दि. 15 जानेवारी 2019 पर्यंत देण्यात आली होती.
यासंदर्भात चित्रकला परीक्षेचे निकाल उशीरा लागल्याने विद्यार्थी हित लक्षात घेता फक्त चित्रकलेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी शासनाने दि. 18 जानेवारी 2019 रोजीच्या पत्रान्वये मुदतवाढ दिलेली असून, त्यानुसार चित्रकला ग्रेड परीक्षेचे प्रस्ताव माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे दि. 25 जानेवारी 2019 पर्यंत सादर करावे.
मार्च 2019 मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी (इ. 10 वी) प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व माध्यमिक शाळा यांनी नोंद घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी. कोणताही पात्र विद्यार्थी सदर गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार याची सर्व शाळाप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे पुणे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी एका प्रकटनाद्वारे कळविले आहे.  
000000

गुरुवार, १७ जानेवारी, २०१९


सहकारी संस्थांच्या लवाद नामतालीका हरकतीबाबत सूचना

अमरावती, दि.17 : बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 चे कलम 84 (4) अन्वये सन 2019-2022 या कालावधीसाठी संघटनात्मक व कायदेशीर आणि आर्थिक व लेखविषयक बाबींविषयी प्रारुप लवाद नामतालिका सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, याचे sahakarayukta.maharashtra.gov.in               या संकेतस्थळावर तसेच महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे mahasahakar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 15 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द केलेली आहे. प्रारुप नामतालिकेवर दि. 31 जानेवारी 2019 पर्यंत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयातील कायदा व वैधानिक कार्यवाही कक्षामध्ये हरकती दाखल करता येतील. सदर मुदतीत प्राप्त हरकतीवर दि. 18 फेब्रुवारी 2019 पर्यंत निर्णय घेवून दि. 28 फेब्रुवारी 2019 रोजी अंतिम लवाद नामतालिका प्रसिध्द केली जाईल, असे सहकार विभागाद्वारे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे
000000