शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२६


विभागीय आयुक्त कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व

इंदिरा गांधी यांना अभिवादन



अमरावती,दि.31 : भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप टांक यांच्या हस्ते इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या एकात्मतेसाठीचे योगदान तसेच इंदिरा गांधी यांचे देशाच्या विकासातील योगदान यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.

यावेळी स्वीय सहायक मेश्राम, नाझर आशिष अंबाडकर यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा