बुधवार, २४ एप्रिल, २०२४

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in  संकेतस्थळ

 

अमरावती दि. 24:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मंगळवार दि. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी कळविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आदी योजना राबविण्यात येतात.

सन2023-24 या वर्षाअखेर महाडीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज प्रलंबित असल्याचे डॅशबोर्डवरील स्थितीवरून दिसून येत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी परिक्षा फी(फ्रीशिप) या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झालेली आहे.

महाडीबीटी पोर्टलवर विविध कारणास्तव अद्यापही अर्ज प्रलंबित असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची कागदपत्रे परिपूर्ण नसणे, संबंधित महाविद्यालयाची शुल्क रचना निश्चित नसणे, संबंधित अभ्यासक्रमास मान्यता प्रदान नसणे, विद्यापीठाने इतर शुल्क मंजुरीकरिता उशिराने महाआयटी कडे पाठविणे व त्या शुल्कास महाआयटी कडून उशिराने मान्यता प्रदान करणे इ.बाबींचा/ त्रुटींचा प्रामुख्याने समावेश आहे.

सन 2023-24 या वर्षाकरिता विविध स्तरावर प्रलंबित अर्जाची संख्या व अनुषंगीक अडचणींना लक्षात घेता महाडीबीटी पोर्टलवर सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पोर्टलवरील होम पेजवर सुध्दा मुदतवाढीबाबत सूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अर्ज विहित वेळेत निकाली न काढल्यास, असे अर्ज महाडीबीटी प्रणालीमधून कायमस्वरूपी रद्दबातल (Auto-Reject) होतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच महाडीबीटी पोर्टलवर चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता ओंनलाईन अर्जाची नोंदणी दि 1 जून, 2024 पासून सुरु होणार आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी त्रुटींचे निराकरण करुन शिष्यवृत्तींचे प्रलंबित अर्ज विहित मुदतीत निकाली काढावे, अशा सूचना विभागाव्दारे देण्यात आल्या आहेत.

            विहित मुदतीत महाडीबीटी प्रणालीवरील पात्र अर्ज निकाली न काढल्यास किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

0000

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळ

                            महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in  संकेतस्थळ

 

अमरावती दि. 19:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मंगळवार दि. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी कळविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आदी योजना राबविण्यात येतात.

सन2023-24 या वर्षाअखेर महाडीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज प्रलंबित असल्याचे डॅशबोर्डवरील स्थितीवरून दिसून येत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी परिक्षा फी(फ्रीशिप) या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झालेली आहे.

महाडीबीटी पोर्टलवर विविध कारणास्तव अद्यापही अर्ज प्रलंबित असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची कागदपत्रे परिपूर्ण नसणे, संबंधित महाविद्यालयाची शुल्क रचना निश्चित नसणे, संबंधित अभ्यासक्रमास मान्यता प्रदान नसणे, विद्यापीठाने इतर शुल्क मंजुरीकरिता उशिराने महाआयटी कडे पाठविणे व त्या शुल्कास महाआयटी कडून उशिराने मान्यता प्रदान करणे इ.बाबींचा/ त्रुटींचा प्रामुख्याने समावेश आहे.

सन 2023-24 या वर्षाकरिता विविध स्तरावर प्रलंबित अर्जाची संख्या व अनुषंगीक अडचणींना लक्षात घेता महाडीबीटी पोर्टलवर सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पोर्टलवरील होम पेजवर सुध्दा मुदतवाढीबाबत सूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अर्ज विहित वेळेत निकाली न काढल्यास, असे अर्ज महाडीबीटी प्रणालीमधून कायमस्वरूपी रद्दबातल (Auto-Reject) होतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच महाडीबीटी पोर्टलवर चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता ओंनलाईन अर्जाची नोंदणी दि 1 जून, 2024 पासून सुरु होणार आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी त्रुटींचे निराकरण करुन शिष्यवृत्तींचे प्रलंबित अर्ज विहित मुदतीत निकाली काढावे, अशा सूचना विभागाव्दारे देण्यात आल्या आहेत.

            विहित मुदतीत महाडीबीटी प्रणालीवरील पात्र अर्ज निकाली न काढल्यास किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

0000

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवावा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

                                 








लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवावा

                                                      -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

* दिव्यांग, तृतीयपंथी मतदारांशी संवाद

* लोकसभा निवडणुकीचा आढावा ; नियंत्रण कक्षाची पाहणी

बुलडाणा, दि. 18 : सक्षम लोकशाहीसाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, तृतीयपंथी आदी सर्व मतदारांनी मतदानासाठी समोर येऊन मतदान करावे. तसेच मतदानासाठी इतरांनाही प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमती पाण्डेय यांनी आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मतदान करण्यासंदर्भात जनजागृती करुन मतदान करण्यासाठीची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचरकर, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, समाजकल्याण सहायक आयुक्त अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी यावेळी उपस्थित होते.

            श्रीमती पाण्डेय यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षास भेट दिली. मतदार हेल्पलाईन, सी-व्हिजील, सीसीटीव्ही यंत्रणा आदींबाबत त्यांनी माहिती घेतली. मतदार हेल्पलाईनवर येणाऱ्या दूरध्वनीबाबत कॉलसेंटरप्रमाणे उपस्थित कर्मचारी यांनी आपली ओळख द्यावी. त्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, ही माहिती देताना नम्रपणे ही माहिती देण्यात यावी. निवडणुकीच्या कालावधीत नियंत्रण कक्ष महत्वाची भूमिका बजावित असतो. या कक्षाने इतर नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे. जिल्ह्याला इतर राज्याची सिमा आहे. याठिकाणी असलेल्या चेकपोस्टवरील यंत्रणा सक्षमपणे सुरू ठेवावी.

            लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. महिला मतदारांची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत त्यांनाही सहभागी करून घ्यावे. ही‍ निवडणूक मुक्त आणि नि:ष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमती पाण्डेय यांनी यावेळी केले. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध घटकांशी संवाद साधून त्यांचा सहभाग नोंदवून घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज श्रीमती पाण्डेय यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. तसेच तृतीयपंथी आणि दिव्यांग मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना व्हील चेअर आणि मतदान केंद्रावर आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्तांची नियंत्रण कक्षाला भेट

            विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालात स्थापित लोकसभा निवडणूक नियंत्रण कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी हेल्पलाईनवरील नोंदीची पाहणी केली. तसेच दूरध्वनी, सी-व्हीजील ॲपवरील तक्रारींची माहिती घेतली. निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या स्थीर सर्व्हेक्षण पथकाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फिरत्या पथकांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. यावेळी त्यांनी थांबलेल्या पथकांशी संपर्क साधून माहिती घेतली.

00000

विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा


 विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा


निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, नि:ष्पक्ष व भयमुक्त वातावरणात

पार पडण्यासाठी जबाबदारीने प्रयत्न करा

                             - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर दि. 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. याअनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक नियमांचे व सूचनांचे विभागातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काटेकोर पालन करुन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, नि:ष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक पूर्वतयारीचा आढावा विभागीय आयुक्तांनी आज घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त संजय पवार, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, विधी अधिकारी प्रत्यक्षरित्या तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राज्यघटनेने दिलेल्या मतदान करण्याच्या अधिकाराचा वापर करावा. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, मतदार जागृती व साक्षरतेसाठी स्वीप मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात यावे. युवा मतदारांना मतदानाच्या राष्ट्रीय उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करावे. जिल्ह्यातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृहमतदान अधिक प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न करावे. आदर्श आचारसंहितेचे उमेदवारांकडून काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी केल्या.

            मतदान केंद्रे, मतदारांची माहिती, मतदानाची ठिकाणे व तेथील व्यवस्था, माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समिती, प्रशिक्षण कार्यक्रम, मनुष्यबळ, आचारसंहिता कक्ष, सीव्हीजील ॲप, खर्च सनियंत्रण समिती पथक, आदर्श आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात चेकपोस्टव्दारे तपासणी, वनविभागाचे चेकपोस्ट, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी, राजकीय प्रचाराच्या जाहिराती व चित्रफीतींचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणिकरण, पेड न्यूज आदी लोकसभा निवडणूक अनुषंगाने विविध विषयांचा विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.

0000

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

विभागीय आयुक्तालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 


                           विभागीय आयुक्तालयात

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

अमरावती दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावने, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, ‍विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

00000

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघासाठी 90 उमेदवार निवडणूक रिंगणात

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024

 

अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघासाठी 90 उमेदवार निवडणूक रिंगणात

 

 

अमरावती, दि.08 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात 90 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  

           

अमरावती लोकसभा मतदारसंघात 56 उमेदवारांपैकी आज नामनिर्देशपन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 37 उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत होणार आहे.

 

अकोला लोकसभा मतदारसंघात 17 उमेदवारांपैकी आज नामनिर्देशपन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नारायण हरिभाऊ गव्हाणकर (अपक्ष) व गजानन साहेबराव दोड (अपक्ष) या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 15 उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत होणार आहे.

 

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदासंघात 20 उमेदवारांपैकी आज नामनिर्देशपन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

 

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 25 उमेदवारांपैकी आज नामनिर्देशपन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयराज हरिभाऊ शिंदे (अपक्ष), दिपक भानुदास जाधव (पिलल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रॅटीक), ज्ञानेश्वर पुरुषोत्तम गणेश पाटील (अपक्ष), नामदेव दगडू राठोड (अपक्ष) या चार उमेदवारांनी अर्ज मार्ग घेतले. त्यामुळे आता 21 उमेदवारांमध्ये निवडणूक रिंगणात आहेत.

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

0000

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

आदर्श आचार संहितेमुळे ८ एप्रिलचा विभागीय लोकशाही दिन रद्द

 आदर्श आचार संहितेमुळे  एप्रिलचा विभागीय लोकशाही दिन रद्द

अमरावती, दि. 5:  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याने ८ एप्रिल २०२४ रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नाही, असे विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.

          शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेत विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिन घेण्यात येतो. मात्र, आदर्श आचार संहितेमुळे या महिन्यात सोमवार ८ एप्रिल रोजी प्रस्तावित असणारा विभागीय लोकशाही दिन घेतला जाणार नाही असे कळविण्यात आले आहे.

00000

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, विभागातील चार लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 118 वैध तर 36 उमेदवारी अर्ज अवैध, सोमवारपर्यंत (8 एप्रिल) उमेदवारी अर्ज मागे घेता येणार

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

विभागातील चार लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 118 वैध

तर 36 उमेदवारी अर्ज अवैध

 

सोमवारपर्यंत (8 एप्रिल) उमेदवारी अर्ज मागे घेता येणार

         अमरावती, दि.5 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये एकूण 154 पैकी 118 उमेदवारांचे अर्ज वैध तर 36 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. सोमवार, दि. 8 एप्रिल ही नामनिर्देशपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.

विभागातील चार लोकसभा मतदारसंघात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय वैध व अवैध ठरलेले नामनिर्देशनपत्र पुढीलप्रमाणे आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र भरलेल्या एकूण 59 उमेदवारांपैकी 56 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 3 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

अकोला लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र भरलेल्या एकूण 28 उमेदवारांपैकी 17 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र भरलेल्या एकूण 29 उमेदवारांपैकी 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र भरलेल्या एकूण 38 उमेदवारांपैकी 20 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 18 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

छाननीअखेर अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व पक्ष याबाबत तपशील :

अमरावती लोकसभा मतदारसंघातून श्री. व्यंकटेश्र्वरा महा स्वामीजी ऊर्फ दीपक (भारतीय जनता पार्टी), श्री. नागोराव वामनराव हंबर्डे (बहुजन समाज पार्टी), राजेश ब्रिजलाल चौधरी (बहुजन समाज पार्टी) या तीन उमेदवारांचे अर्ज छाननीअखेर अवैध ठरले आहे.

            अकोला लोकसभा मतदारसंघातून रमेश इंगळे (बहुजन समाज पार्टी), अरूण भागवत (अपक्ष), पूजा शर्मा (अपक्ष), सचिन शर्मा (अपक्ष), नितीन वालसिंगे (अपक्ष), महेंद्र मिश्रा (अपक्ष), अंबादास दांदळे (अपक्ष), प्रमोद पोहरे (अपक्ष), ॲड. रामभाऊ खराटे (वीरों के वीर इंडियन पार्टी), रजनीकांत (अपक्ष), शेख मजहर शेख इलियास (अपक्ष) या अकरा उमेदवारांचे अर्ज छाननीअखेर अवैध ठरले आहे.

            बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून संजय रामभाऊ गायकवाड (शिवसेना), श्याम बन्सीलाल शर्मा (अपक्ष), ॲड. सैयद मुबीन सैय्यद नईम (अपक्ष), विलास शंकर तायडे (बहुजन समाज पार्टी) या चार उमेदवारांचे अर्ज छाननीअखेर अवैध ठरले. यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची माहिती अप्राप्त आहे.

विभागातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, दि. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

0000

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, अमरावती विभागात आज 96 उमेदवारांनी 115 नामनिर्देशनपत्र दाखल केली.

 

     लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

अमरावती विभागात आज 96 उमेदवारांनी 115 नामनिर्देशनपत्र दाखल केली

 

अमरावती, दि. 04 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 29 उमेदवारांनी 34, अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये 20 उमेदवारांनी 24, बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 17 उमेदवारांनी 21, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये 30 उमेदवारांनी 36 असे एकूण 96 उमेदवारांनी 115 नामनिर्देशनपत्र दाखल  केली आहेत.

अमरावती विभागात नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत अमरावती लोकसभा मतदासंघात 59 उमेदवारांनी 73, अकोला लोकसभा मतदासंघात 28 उमेदवारांनी 40, बुलडाणा लोकसभा मतदासंघात 29 उमेदवारांनी 42 तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 38 उमेदवारांनी 49 नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहे. असे एकूण अमरावती विभागात 154 उमेदवारांनी 204 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.

विभागातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दि. 28 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

00000

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, अमरावती विभागात आज 39 उमेदवारांनी 48 नामनिर्देशनपत्र दाखल केली.

 


     लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

अमरावती विभागात आज 39 उमेदवारांनी 48 नामनिर्देशनपत्र दाखल केली

अमरावती, दि. 03 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 23 उमेदवारांनी सतावीस, अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये 6 उमेदवारांनी नऊ, बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 6 उमेदवारांनी सात, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये 4 उमेदवारांनी पाच असे एकूण 39 उमेदवारांनी 48 नामनिर्देशनपत्र दाखल  केली आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 23 उमेदवारांनी  27 नामनिर्देशन पत्रे दाखल केली.

अकोला लोकसभा मतदारसंघातून अशोक थोरात (अपक्ष),  रत्नदीप गणोजे (अपक्ष), अभय पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन), काशिनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टीच्या वतीने दोन), अनुप धोत्रे(भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन) शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग) नामनिर्देशन अर्ज दाखल केले.   

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून नंदू जगन्नाथ लवंगे (अपक्ष), उद्धव ओंकार आठोळे (अपक्ष),  मोहंमद हसन इनामदार (मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी), संदिप शेळके (अपक्ष), सुमन मधुकर तिरपुडे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया) व रविकांत चंद्रदास तुपकर (अपक्ष दोन) नामनिर्देशन अर्ज दाखल केले. 

यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय उत्तमराव देशमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दोन), धरम दिलीपसिंग ठाकूर (सन्मान राजकीय पक्ष), संगिता दिनेश चव्हाण (अपक्ष) व विशाल शालीकराम वाघ (पक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी) नामनिर्देशन अर्ज दाखल केले.   

अमरावती विभागात आजपर्यंत अमरावती लोकसभा मतदासंघात 30 उमेदवारांनी 39, अकोला लोकसभा मतदासंघात 12 उमेदवारांनी 16, बुलडाणा लोकसभा मतदासंघात 12 उमेदवारांनी 21 तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 8 उमेदवारांनी 13 नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहे. असे एकूण आजपर्यंत अमरावती विभागात 62 उमेदवारांनी 89 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.

विभागातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दि. 28 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

00000