शुक्रवार, २४ जुलै, २०२६

 

          सामाजिक क्षेत्र वॉर रूम अंतर्गत #नीती आयोगाच्या शाश्वत विकास निर्देशांक उद्दिष्टांमधील १७ निर्देशांकांबाबत राज्याच्या प्रगतीचा विस्तृत आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घेतला.



          नीती आयोगाने मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या विविध निर्देशांकावर राज्यांमध्ये विकासात्मक स्पर्धा सुरू केली आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांमधील (एसडीजी) सर्वच निर्देशांकांमध्ये महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळवावे.यासाठी पुढील चार वर्षांसाठी विभागनिहाय आणि परिणामाधारित नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाने आकांक्षित म्हणून जाहीर केलेले १० जिल्हे व १७७ तालुक्यांमध्ये नीती आयोगाचे निर्देशांकानुसार मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करून महाराष्ट्राला सर्वात पुढे ठेवण्याचे आवाहन केले.

          गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करत आहे. महाराष्ट्राची क्षमता लक्षात घेता २०३० पर्यंत अधिक वेगाने वाटचाल करण्यासाठी नीती आयोगाच्या विविध निर्देशांकांमध्ये अधिक परिणामकारकपणे काम करण्याची गरज आहे. पुढील चार वर्षे राज्याच्या विकासासाठी निर्णायक असून या काळात योजनांचे पुनर्रचना व बळकटीकरण करावे. या कालावधीत ठोस नियोजन करून महाराष्ट्राला शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये देशात अव्वल आणण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आगामी अर्थसंकल्पीय नियोजन शाश्वत विकास निर्देशांकाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेला गती देण्यासाठी उपयोगात आणावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


          या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा तसेच सर्वच विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, सेंटर फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स ऑफ इंडियन स्टेट्सचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यपालन अधिकारी शंकर नारायणन, सदस्य विनी महाजन, आलिशा लकडावाला आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.



#नीतीआयोग
#planningcommission

गुरुवार, २३ जुलै, २०२६

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६






#कर्जमुक्तीयोजना
#महाराष्ट्रशासन
#महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#MahaDGIPR

 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी!




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करण्यात आली आहे.

#कर्जमुक्तीयोजना
#महाराष्ट्रशासन
#महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#MahaDGIPR

 राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.



राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवत आहेत. #आरोग्य, #पोषण, #जलसुरक्षा, #पर्यावरणसंवर्धन, क्रीडा आणि शालेय पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण काम करणारे उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मोंडेलेज इंडियाच्या ‘शुभ आरंभ’ या प्रमुख सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या १३ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ आणि खेड तालुक्यातील ६० गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार आरोग्य, पोषण, शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि समुदाय विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला असून, शासनाच्या विविध योजनांनाही प्रभावी पूरक बळ मिळाले आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यासंदर्भातील सविस्तर वृत्त -https://mahasamvad.in/208060/

#सीएसआर
#महाराष्ट्रशासन
#शासकीयउपक्रम
#शुभआरंभ
#CSR

बुधवार, २२ जुलै, २०२६

 


विभागीय आयुक्तालयात अजित पवार यांना अभिवादन

अमरावती, दि. २२ : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त संतोष कवडे,  सहायक आयुक्त वैशाली पाथरे ,  नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

#शेतकरीकर्जमुक्ती

#कर्जमुक्तीयोजना2026

#महाराष्ट्रशासन

#शेतकरी


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६


#Maharashtra
#DGIPR
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना2026
#महाराष्ट्रशासन
#शेतकरी

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६


#Maharashtra
#DGIPR
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना2026
#महाराष्ट्रशासन
#शेतकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘अजित स्मृती, अविट स्मृती’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

 महिला आर्थिक विकास महामंडळ सभागृह, मुंबई









मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘अजित स्मृती, अविट स्मृती’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून अजितदादांचा संपूर्ण जीवनप्रवास सुंदरपणे उलगडला गेला आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची झलक यातून पाहायला मिळते. त्यांच्या संपूर्ण जीवनपटाचे दर्शन होत असून आपल्या सर्वांच्या मनात त्यांच्या स्मृती कायम राहतील, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दादांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांवर प्रेम करणाऱ्या, त्यांना मानणाऱ्या प्रत्येकाने हे छायाचित्र प्रदर्शन आवर्जून पाहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री बाबासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
#अजितपवार
#छायाचित्रप्रदर्शन
#अजित_स्मृती_अविट_स्मृती

मंगळवार, २१ जुलै, २०२६

 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते ३१ जुलैदरम्यान पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण मोहीम