बुधवार, २२ जुलै, २०२६

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘अजित स्मृती, अविट स्मृती’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

 महिला आर्थिक विकास महामंडळ सभागृह, मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘अजित स्मृती, अविट स्मृती’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून अजितदादांचा संपूर्ण जीवनप्रवास सुंदरपणे उलगडला गेला आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची झलक यातून पाहायला मिळते. त्यांच्या संपूर्ण जीवनपटाचे दर्शन होत असून आपल्या सर्वांच्या मनात त्यांच्या स्मृती कायम राहतील, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दादांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांवर प्रेम करणाऱ्या, त्यांना मानणाऱ्या प्रत्येकाने हे छायाचित्र प्रदर्शन आवर्जून पाहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री बाबासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
#अजितपवार
#छायाचित्रप्रदर्शन
#अजित_स्मृती_अविट_स्मृती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा