प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेत (रामेती) व्याख्याते
पदाकरीता अर्ज आमंत्रित
व्याख्यात्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे
अमरावती,दि. 14 : प्रादेशिक कृषी विस्तार
व्यवस्थापन संस्थेद्वारे (रामेती) ही अमरावती विभागातील कृषी व संलग्न व्यवसायातील
विस्तार प्रशिक्षणाचे कार्य केले जाते. संस्थेच्या माध्यमातून कृषी व संलग्न
विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, आत्मा अंतर्गत
कार्यरत कर्मचारी, आत्मा तालुका व जिल्हा समितीचे सदस्य व पदाधिकारी विविध विषयावर
प्रत्यक्ष व दुरस्थ प्रणालीद्वारे प्रशिक्षण देतात. अमरावती येथील प्रादेशक कृषी
विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथे विविध विषयांतील तज्ञ
व्यक्तीकडून व्याख्याते पदाकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कृषी
विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत त्या त्या विषयातील सखोल, तांत्रिक ज्ञान अधिक
परिणामकारकपणे पोहोचविण्यासाठी संबंधित विषयातील पारंगत, व्याख्याते उपलब्ध करुन
घेऊन त्यांची नामनिर्देशिका तयार करणे व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग संस्थेमार्फत
राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात करुन घेऊन विस्तार यंत्रणेला अधिक
प्रभावी करण्यासाठी रामेती संस्थेमार्फत अमरावती जिल्हा व विभागातील विषय तज्ञांनी
त्यांचे विषय, त्या विषयातील शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर प्राविण्याच्या
माहितीसह आपला परिचय रामेती अमरावतीच्या ई- मेल rameti- a mravati@rediffmail.com
वर पाठवावे. संस्थेच्या वार्षिक प्रशिक्षण दिनदर्शिकेतील विषयानुसार
व्याख्याते म्हणून त्यांना वेळोवळी पाचारण करणे सोयीचे होईल.
प्रशिक्षणात
विविध विषयांचा समावेश
प्रशिक्षणात प्रामुख्याने अमरावती
विभागातील प्रमुख शेती पिके, फळपिके, भाजीपाला, फुलपिक इत्यादीचे उत्पादन
तंत्रज्ञान, किडरोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, काढणी पश्चात तंत्रज्ञान,
उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन, तंत्रज्ञान जसे की सुक्ष्म सिचन, संरक्षित
शेती यांत्रिकीकरण, प्रक्रिया व पणन या सारख्या विषयावर 1 ते 5 दिवसांच्या कालावधीची प्रशिक्षणे दिली जातात.
उत्पादन
तंत्रज्ञानाबरोबरच बाजारपेठेविषयी माहिती देणाऱ्या विषयांचा समावेश
प्रमुख पिकांचा उत्पादन तंत्रज्ञान
बरोबरच शेतकरी समूह संघटन, शेतकरी उत्पादन कंपनीची स्थापना व व्यवस्थापन, क्षमता
बांधणी, बाजार आराखडे तयार करणे, बाजार व्यवस्थापन, मूल्य साखळी व्यवस्थापन, कृषी
निविष्ठांचे गुणनियंत्रण, सेंद्रिय शेती, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, जमीन आरोग्य
व्यवस्थापन, मृद व जल संधारण, शेतपिके व फळ पिकांवरील किडरोग निरीक्षण व
व्यवस्थापन प्रकल्प, माहिती तंत्रज्ञान, व्यक्तीमत्व विकास, वेळेचे व्यवस्थापन,
लेखा व आस्थापना विषयक व्यवस्थापन, विस्तार कौशल्य, संवाद कौशल्य, नेतृत्व विकास,
ताणतणाव व्यवस्थापन आदी अनेक विषयावर प्रशिक्षणे संस्थेमार्फत आयोजीत केली जातात.
शेतीपुरक व्यवसायासोबत कृषी विभागाच्या विविध विषयांची माहिती प्रशिक्षणातुन
देण्यात येते
कृषी व फलोत्पादना बरोबरच
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग, वन व चारा पिके, मधुमक्षिका पालन, मत्स्य
पालन इत्यादी शेती पूरक व्यवसायामधील तांत्रिक विषय, प्रक्रिया व पणन बाबत विषय,
वैयक्तीक विकासाबाबत विविध विषय, कृषी विभागातील राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
व प्रकल्पाअंतर्गत कार्यपध्दती, महा डी. बी. टी. व इतर ऑनलाईन कार्यपध्दती, कृषी सांखिकी, पिक
विमा, फळपिक विमा व शेतकरी अपघात विमा, आपात्कालीन पिक व्यवस्थापन या सारख्या अनेक
विषयांची प्रशिक्षणे संस्थेमार्फत घेतली जातात.
कृषि व संलग्न व्यवसाय व इतर
विषयातील व्याख्यात्यांनी संस्थेच्या ई-मेल वर आपले परिपुर्ण परिचय लेख पत्र
व्यवहाराचा पत्ता व भ्रमणध्वनीसह पाठवावेत असे आवाहन रामेतीचे प्राचार्य विजय
चवाळे यांनी केले आहे.
000000000