प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #ड्रगफ्रीमुंबई अभियानाच्या प्रारंभाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत हे अभियान नशामुक्त, जागरूक आणि सशक्त समाजाच्या निर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी त्यांच्या संदेशात नमूद केले.
मुंबईतील ऊर्जावान युवकांची स्वप्ने आणि आकांक्षा भारताच्या विकासाशी निगडित असून, त्यांना योग्य दिशा आणि सकारात्मक वातावरण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले 'ड्रग फ्री मुंबई' अभियान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी हजारो विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहून आणि लाखो युवक ऑनलाइन माध्यमातून नशामुक्त जीवनाची शपथ घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत, जनजागृती हेच सर्वात प्रभावी संरक्षण असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले. युवकांना योग्य दिशा देणारा हा उपक्रम निश्चितच #नशामुक्तभारत च्या राष्ट्रीय संकल्पाला नवी गती देईल, असा विश्वास व्यक्त करून प्रधानमंत्री यांनी 'ड्रग फ्री मुंबई' अभियानाच्या यशासाठी तसेच देशातील सर्व युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
#नशामुक्तमुंबई #जनजागृती
#DrugFreeMumbai #SayNoToDrugs #HealthyYouth #SafeMaharashtra #YouthAwareness #DrugFreeIndia #HealthyLifestyle

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा