सोमवार, ३ जानेवारी, २०२२

लेट डॉ. एस. एस. गडकरी ॲन्युअल मेमोरिअल ॲवार्ड फॉर इनोव्हेशन इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन -2022 पुरस्काराकरीता 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज आमंत्रित

 

लेट डॉ. एस. एस. गडकरी ॲन्युअल मेमोरिअल ॲवार्ड फॉर

                              इनोव्हेशन इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन -2022

                          पुरस्काराकरीता 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज  आमंत्रित

 

अमरावती दि.3:- ज्या अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्षम, प्रभावी वेळोवेळी पारदर्शक, नागरिक केंद्रित आणि नागरिकांच्या सार्वजनिक सेवेला विलंब न लावता त्यांचेसाठी विकसित केलेल्या कल्पना ज्या शासनाच्या नियमांच्या आधारे कार्यन्वित करण्यात आलेली आहे. आणि सर्वांसाठी फायदेशिर ठरलेली आहे. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना लेट डॉ. एस. एस. गडकरी ॲन्युअल मेमोरिअल ॲवॉर्ड फॉर इनोव्हेशन इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 2022 या पुरस्काराने गौरविण्यात येते. नामनिर्देशन करण्यात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचेबाबतीत पुरस्कारासाठी निकष लावण्यात आलेले आहेत. प्रशस्तीपत्र व दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असून पात्रता असलेल्या निकषांप्रमाणे सुयोग्य अधिकारी , कर्मचारी यांचे नामनिर्देश दि. 28 फेब्रुवारी 2022 पूर्वी भारतीय लोक प्रशासन संस्थेकडे पाठवावयाचे आहे.

तसेच भारतीय लोक प्रशासन संस्थेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा 2021-22 आयोजित करण्यात आली आहे. लेट डॉ. एस. एस. गडकरी ॲन्युअल मेमोरिअल ॲवॉर्ड फॉर इनोव्हेशन इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 2022 पुरस्काराकरीता पात्रता निकषांनुसार आपल्या अधिपत्याखालील पात्र अधिकारी, कर्मचारी यांचे नामनिर्देशन करावयाचे असल्यास परिपुर्ण माहिती मुख्यालयास पाठवावी, असे संचालक (माहिती)(प्रशासन) गणेश रामदासी यांनी कळविले आहे.

00000

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क माफ व परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची सुविधा

 


इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क माफ व परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची सुविधा

अमरावती दि.3:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी  परीक्षेच्या दि.27 डिसेंबर 2021 ते दि.01 जानेवारी 2022 व इयत्ता बारावी परीक्षेच्या दि.19 डिसेंबर 2021 ते दि.28 डिसेंबर 2021 पर्यंत विलंब शुल्काने आवेदन पत्र भरणेबाबत तारखा जाहीर करण्यात आलेल्या होत्या.

शैक्षणिक वर्ष 2022 च्या इयत्ता दहावी  व बारावी च्या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येऊ नये तसेच विलंब शुल्क माफ करण्यात यावे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या अशा सुचना शासनाने एका पत्राद्वारे दिल्या आहे.

त्याअनुषंगाने ही सुविधा मार्च-एप्रिल 2022 या वर्षापुरतीच मर्यादित राहील. इयत्ता दहावीची परीक्षा दि.15 मार्च 2022 व इयत्ता बारावीची परीक्षा दि.4 मार्च 2022 पासून सुरु होत आहे. परीक्षेच्या एक दिवस अगोदर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरण्याची सुविधा नियमित शुल्काने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

याबाबतची सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, पालक व इतर संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण 2021-22 पासून सुरु

 

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी

व्यवसाय शिक्षण 2021-22 पासून सुरु

 

अमरावती दि. 3: समग्र  शिक्षा अभियानातंर्गत माध्यमिक/ उच्च माध्यमिक स्तरावरील व्यवसाय शिक्षण या योजनेअंतर्गत सुधारीत अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरु करण्यात येत आहे.  समग्र शिक्षा अंतर्गत राज्यात व्यवसाय शिक्षण माध्यमिक,उच्च माध्यमिक स्तर योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

   यानुसार शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता नववी, अकरावी व शेक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता दहावी व बारावीचा सुधारित अभ्यासक्रम, विषय व विषयांचे कोड क्रमांक कळविण्यात आलेले असून सुधारित जॉब रोल अभ्यासक्रमानुसार माध्यमिक शालांत, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 2021 चे आयोजन होणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. तथापि इयत्ता नववी व अकरावीच्या मूल्यमापन योजनेमध्ये कोणताच बदल नसून परिपत्रकामध्ये नोंद केल्याप्रमाणे नववी व इयत्ता 11 वीसाठी मूल्यमापन योजना लागू राहील.

समग्र शिक्षा, मुंबई यांचेकडून शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून इयत्ता दहावी व इयत्ता  बारावी मध्ये राबविले जाणाऱ्या विषयांची यादी व इयत्ता नववी मध्ये सुरु होणाऱ्या नविन विषयांची यादी व पाठयपुस्तके प्राप्त झालेली आहेत. इयत्ता नववी ते बारावीच्या विषयांची नावे व नविन विषय कोड क्रमांक याचा तपशील मंडळाच्या संकेतस्थळावर आहे. या योजनेअंर्तगत असलेल्या व्यवसाय शिक्षण विषयांस मंडळाची वेगळी मान्यता शाळा/उच्च माध्यमिक शाळांनी घेण्याची आवश्यकता नाही. हा अभ्यासक्रम PSSCIVE संस्थेच्या www.psscive.nic.in या संकेत स्थळावर व मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

या संबंधित सर्व बाबी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचे निदर्शनास आणून शाळांच्या सूचना फलकावर लावण्यात याव्या. याबाबत अहवाल विभागीय मंडळास सादर करावा. इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचा सुधारित अभ्यासक्रम, जॉब रोलनुसार मुल्यमापन आराखडे, प्रात्यक्षिक गुणदान योजना, घटकनिहाय गुणविभागणी इ. मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे डॉ. अशोक भोसले  यांनी कळविले आहे.

0000000

अमरावती जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्टया जाहीर

 

अमरावती जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्टया जाहीर

अमरावती दि. 3: विभागीय आयुक्त पीयूष सिं‍ह यांनी अमरावती जिल्ह्यासाठी वर्ष 2022 मध्ये स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी नारळी पोर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधन सणाला, दिनांक 26 ऑगस्ट रोजी पोळा सणानिमित्त आणि दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी लक्ष्मीपूजन सणाच्या दुसऱ्या दिवशी संपुर्ण अमरावती जिल्ह्यासाठी या सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. स्थानिक सुटीचा आदेश अमरावती जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये व अधिकोषांना लागू होणार नसल्याचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

000000

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी

अर्ज सादर करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत

 

       अमरावती, दि.30:  सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे सन 2020-21 व 2021-22 वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस पात्र विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2021पर्यंत आहे.

            सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, अमरावती या कार्यालयातून अर्ज प्राप्त करून परिपूर्ण अर्ज भरून विहित वेळेत सादर करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती माया केदार यांनी केले  आहे.

 

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

 

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या

योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी

31 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 29 : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचे सन 2020-21 व 2021-22 वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील नविन व नुतणीकरणाचे अर्ज भरण्यास 31 डिसेंबर 2021 पर्यत मुदत देण्यात आलेली आहे. अनूसुचित जाती, प्रवर्गातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस पात्र विद्यार्थ्यी व संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज सामाजिक न्याय विभागामार्फत दिनांक 31 डिसेंबर पर्यंम सादर करावे.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन विद्यार्थ्यांनी परिपुर्ण अर्ज भरुन विहीत कागदपत्रासह विहीत वेळेत अर्ज भरुन सादर करावे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयात अर्ज भरण्याचे आणि विहीत मुदतीत सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती माया केदार यांनी आहे.

000000

 

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

भातकुली व तिवसा नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषीत

भातकुली व तिवसा

                नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषीत

 

अमरावती, दि. 28 : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरक्षित असलेल्या जागा अनआरक्षित करण्यात आल्या असून अमरावती जिल्ह्यातील भातकुली व तिवसा नगरपंचायतसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आला असून  निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            भातकुली व तिवसा नगरपंचायत निवडणूकांचे नामनिर्देशनपत्र आज बुधवार दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून सोमवार दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत राज्य निवडणुक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर भरावे. दिनांक 1 व 2 जानेवारी रोजी अनुक्रमे शनिवार व रविवारी सुट्टी असल्याकारणाने नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार नाही. भातकुली नगर पंचायतीसाठीचे नामनिर्देशनपत्र नगर पंचायत भातकुली येथे तर तिवसा नगर पंचायतसाठीचे नामनिर्देशनपत्र तहसील कार्यालय येथे सादर करावे. दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासुन भातकुली व तिवसा नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. भातकुली नगरपंचायतीचे नामनिर्देशनपत्रांची छाननी व नामनिर्देशनपत्र मागे घेता येण्याची प्रक्रीया डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, आठवडी बाजार येथे व तिवसासाठी तहसिल कार्यालय तिवसा येथे करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रे दिनांक 10 जानेवारी 2022 पर्यंत मागे घेता येईल. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची ही अंतिम मुदत राहील. निवडणूक चिन्ह नेमुन देण्याची तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी  प्रसिध्द करण्यात येईल. मतदान दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी सकाळी साडे सात वाजता पासून सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत घेण्यात येईल. दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी मतमोजणी व निवडणूकींचे निकाल घोषीत करण्यात येईल. भातकुली नगरपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या मतांची मोजणी भातकुली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तर तिवसा नगरपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या मतांची मोजणी तिवसा तहसिल कार्यालयात करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

000000

 


सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

डॅा.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 




डॅा.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी

विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 

          अमरावती, दि. 27 : शिक्षण महर्षी आणि कृषि क्रांतीचे प्रणेते डॅा. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूषसिंह यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          अभिवादन कार्यक्रमाच्यावेळी उपायुक्त सामान्य प्रशासन संजय पवार, तहसिलदार वैशाली पाथरे, तहसिलदार निकीता जावरकर, नाझर पेठे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

दहावीची परीक्षा 15 मार्च व बारावीची परीक्षा 4 मार्च पासून

 

दहावीची परीक्षा 15 मार्च व

बारावीची परीक्षा 4 मार्च पासून

वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

 

अमरावती, दि. 22 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा शैक्षणिक वर्ष 2022 मधिल मार्च महिन्यात घेण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील नियोजन मंडळाने केले असून परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

इयत्ता बारावीची  (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम परीक्षा दिनांक 4 मार्च ते दिनांक 30 मार्च 2022 पर्यंत आयोजित करण्यात आली असून इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 15 मार्च ते दिनांक 4 एप्रिल 2022 पर्यंत घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबतचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच इतर माध्यमातून प्रसारीत झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरु नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

                                                          000000

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

अमरावती जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्टया जाहीर

 

अमरावती जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्टया जाहीर

अमरावती, दि. 21 : विभागीय आयुक्त पीयूष सिं‍ह यांनी अमरावती जिल्ह्यासाठी वर्ष 2022 मध्ये स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. दिनांक 17 मार्च 2022 रोजी होळी सणाच्या पहील्या दिवशी, दिनांक 26 ऑगस्ट रोजी पोळा सणानिमित्त आणि दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी लक्ष्मीपूजन सणाच्या दुसऱ्या दिवशी संपुर्ण अमरावती जिल्ह्यासाठी या सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. स्थानिक सुटीचा आदेश अमरावती जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये व अधिकोषांना लागू होणार नसल्याचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

000000