भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जयरामगड येथे ‘जनजाती गौरव सेवा सप्ताह’
शिबिर उत्साहात संपन्न
शिबिरात पारधी व फासेपारधी समाजातील नागरिकांना आधार
कार्ड, रेशन कार्ड, जातीचे दाखले यांसारखी महत्त्वाची शासकीय कागदपत्रे
मिळविण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सविस्तर समजावून सांगण्यात आली. तसेच
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत पात्र लाभार्थ्यांसाठी राबविण्यात
येणाऱ्या विविध वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ
घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तहसील कार्यालय आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी वस्तीतील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या शिबिरामुळे पारधी वस्तीतील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळाले. शिबिराला महिला, पुरुष आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
0000
#जनजातीयगौरवदिवस #भगवानबिरसामुंडा #सेवासप्ताह२०२६



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा