बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र आणि #दिलखुलास कार्यक्रमात रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांची मुलाखत प्रसारित करण्यात येत आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार, दि. २१, सोमवार, दि. २३ आणि मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराची शाश्वती, आर्थिक स्थैर्य आणि गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने ‘विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)’ अर्थात ‘व्हीबी-जी राम जी’ हा महत्वपूर्ण कायदा आणला. या कायद्यांतर्गत ग्रामीण कुटुंबांना वर्षाकाठी १२५ दिवस रोजगाराची हमी देण्यात आली आहे. या नव्या कायद्याची उद्दिष्टे, महत्वपूर्ण तरतुदी, ग्रामीण जनतेला होणारे लाभ आणि महाराष्ट्रातील अंमलबजावणीचे नियोजन याविषयीची माहिती या मुलाखतीत देण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा