बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६

 


दिवाळीच्या सुट्ट्या आणि परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या लालपरीला मोठी पसंती दिली. नोव्हेंबरच्या पहिल्या १६ दिवसांत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ५४८ कोटी २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. विशेष म्हणजे, १६ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात ४६ कोटी ५३ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवत एसटीने नवा उच्चांक गाठला. या प्रतिसादाबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांचे आभार मानले.

यंदा दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात हंगामी भाडेवाढ रद्द केल्यामुळे प्रवाशांना नेहमीच्या तिकीट दरात प्रवास करता आला. तसेच महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीतील शिथिलता आणि सणासुदीच्या काळातील वाढती प्रवासी संख्या यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली.

प्रवाशांचा विश्वास आणि #एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळे ही विक्रमी कामगिरी शक्य झाली. प्रवाशांना सुरक्षित व सुखकर प्रवासाची सुविधा देण्यासाठी मेहनत घेणाऱ्या चालक, वाहक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष अभिनंदन केले.


#दिवाळी
#MSRTC 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा