राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2025 साठी प्रवेशिका
पाठविण्याकरीता मुदतवाढ
मुंबई, दि. १९
: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट
दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत
केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी
दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या
लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका मागविण्याचा
अंतिम दिनांक 15 मार्च, 2026 असा होता. सदर पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्याकरीता
दि. 31 मार्च, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. तसेच अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.
पुरस्कारांची माहिती
पुरस्कारांचे नाव
व पारितोषिकांचा तपशील पुढीलप्रमाणे -
1.अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)- रु.1 लाख रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2.बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)-51
हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
3.अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)-51
हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
4.बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)-51
हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
5.मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
6.यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती
व जनसंपर्क) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
7.पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार
(राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
8.तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार
(राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व
प्रशस्तीपत्र)
9.केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट
(माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)-51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
10.समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)-51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
11.स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)-51
हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
12. पत्रकार
सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)-51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कार
13. दादासाहेब
पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,
या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले
आहेत.)
14. अनंतराव
भालेराव पुरस्कार, (औरंगाबाद आणि लातूर विभाग)-51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
15. आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)-51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
16.नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)- 51 हजार
रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
17. शि.म.परांजपे
पुरस्कार, (कोकण विभाग)-51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
18. ग.गो.जाधव
पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)-51 हजाररुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
19. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)-51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
20. ग.त्र्यं.माडखोलकर
पुरस्कार, (नागपूर विभाग)-51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
00000
#उत्कृष्टपत्रकारितापुरस्कार
#मुदतवाढ

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा