सोमवार, १६ मार्च, २०२६

#विधानपरिषदप्रश्नोत्तरे

 


सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या नोकरीसंदर्भातील लाड-पागे समितीची प्रलंबित प्रकरणे सहा महिन्यांच्या आत निकाली काढण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला देण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. तसेच राज्यातील सफाई कामगारांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी तसेच लाड-पागे समितीच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगारांसाठी सेवा निवासस्थानांच्या बाबतीत आतापर्यंत ५,५९२ घरांचे वाटप करण्यात आले असून पुनर्विकासानंतर १२,२५४ सेवा निवासस्थान उपलब्ध होणार आहेत.
दादासाहेब गायकवाडनगर मालवणी, मालाड (प) मुंबई येथील म्हाडाच्या मालकीच्या जमिनीचे दोन भाग आहेत. त्यापैकी एक भाग महाराष्ट्र पोलीस फेडरेशनकडे असून उर्वरित भागाचा विकास #म्हाडा मार्फत करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस फेडरेशनला भाडेकराराने देण्यात आलेल्या जमिनीवर उभारण्यात येणारा गृहनिर्माण प्रकल्पासाठी फेडरेशनने बांधकाम करारनामा सादर केला असून मार्च २०३६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता दुरुस्ती व विस्ताराच्या कामासाठी राज्य शासनाने ५९.७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दुरुस्तीचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली.
प्रश्नोत्तरांच्या सविस्तर माहितीसाठी - https://mahasamvad.in/194279/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा