गुरुवार, १२ मार्च, २०२६

यशवंतराव चव्हाण जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन






मुंबईदि. १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकारमहाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उप पंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी विधान भवनमुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेमहाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरमहाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

याप्रसंगी पर्यटनखनिकर्ममाजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाईसहकार मंत्री बाबासाहेब पाटील व दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच विधानमंडळ सचिवालयाचे सचिव -१ जितेंद्र भोळेसचिव ३ डॉ. विलास आठवलेसचिव ४ शिवदर्शन साठ्ये आणि विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

                                                                          00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा