सोमवार, १६ मार्च, २०२६

#विधानसभालक्षवेधी

 


#सिडको क्षेत्रात सध्या ३४२ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून २०२६ च्या गरजेनुसार एकूण ३६५ दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असल्यामुळे सुमारे ३० दशलक्ष लीटर तूट भरून काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करत आहोत. ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर सिडको क्षेत्रात पाणी वितरणासाठी स्टेम्ससारखी यंत्रणा उभारण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

#विधानसभालक्षवेधी
ग्रामीणसह इतर भागात वैद्यकीय सेवांची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या "सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी" (सीसी-एमपी) कोर्ससंदर्भातील प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असून अंतिम आदेश येईपर्यंत प्रमाणपत्र देण्यात येणार नाही अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

#विधानसभालक्षवेधी
#सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशय परिसरातील पर्यटन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पाबाबत उद्भवलेल्या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली.

यासंदर्भातील सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/194274/

#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026


@devendra_fadnavis
https://x.com/Dev_Fadnavis
https://x.com/CMOMaharashtra
#DevendraFadnavis
#CMOMaharashtra

https://ddamravati.blogspot.com/
https://www.facebook.com/ddamravati/
https://www.instagram.com/ddiamravati/?hl=en
https://x.com/InfoDivAmravati

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा