ब्रिटनमधील बर्मिंगहॅमचे खासदार लियाम बर्न यांच्या नेतृत्वात खासदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र देशाचे आर्थिक पॉवर हाऊस असून देशाची 'स्टार्टअप कॅपिटल' आहे. गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट परिसंस्था असलेल्या महाराष्ट्रात ब्रिटनमधील गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रगतीची सविस्तर माहिती दिली.
महाराष्ट्र हे केवळ देशाचे पॉवर हाऊस नाही तर, जगाचे गुंतवणूकदारांचे आकर्षण बनले असल्याचे गौरवोद्गार खासदार लियाम बर्न यांनी यावेळी काढले.
देशाच्या एकूण सकल घरेलू उत्पादनात राज्याचा १३ टक्के वाटा आहे. देशात डेटा सेंटरची ६० टक्के क्षमता महाराष्ट्रात आहे. भारत आणि ब्रिटनमधील व्यापारी करार महाराष्ट्र आणि ब्रिटनसाठी मैलाचा दगड ठरणारा आहे. राज्यात २०३० पर्यंत एकूण ऊर्जा गरजेपैकी ५२ टक्के ऊर्जा ही नवीनीकरणीय क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण करण्याच्या ध्येयपूर्तीसाठी शासन काम करीत आहे. नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये शैक्षणिक दालने उघडण्यासाठी ब्रिटनमधील विद्यापीठांना ' लेटर ऑफ इंटेंट' देण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील भागीदारी निश्चितच उज्वल भविष्यासाठी लाभकारी ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगण, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी शिष्टमंडळाला माहिती दिली.
@devendra_fadnavis

.jpg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा