सोमवार, १६ मार्च, २०२६

#विधानसभालक्षवेधी

 



#विधानसभालक्षवेधी

#हिंगोली जिल्ह्यातील विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित #मराठी माध्यमाच्या शाळेने चुकीची माहिती देऊन शासनाकडे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबंधित शाळेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली.

#विधानसभालक्षवेधी

#मुंबई तील #म्हाडा च्या जीर्ण व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या नियमांतील बदलांना विकासकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अवघ्या सहा महिन्यांत 10 प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एका प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

#विधानसभालक्षवेधी

#नागपूर येथे उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यात या पुतळ्याचे काम पूर्ण होईल. तसेच विद्यार्थ्यांसाठी एआय-आधारित डिजिटल सुविधा सुरू करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत दिली.

#विधानसभालक्षवेधी

#कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील इसापूर येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात लवकरच समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) नियुक्त करून आरोग्यसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

यासंदर्भातील सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/194274/

#अर्थसंकल्पीयअधिवेशन

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६

#MahaBudgetSession

#MahaBudgetSession2026

 

 

@devendra_fadnavis

https://x.com/Dev_Fadnavis

https://x.com/CMOMaharashtra

#DevendraFadnavis

#CMOMaharashtra

 

https://ddamravati.blogspot.com/

https://www.facebook.com/ddamravati/

https://www.instagram.com/ddiamravati/?hl=en

https://x.com/InfoDivAmravati

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा