मंगळवार, १० मार्च, २०२६

#विधानसभालक्षवेधी

 



नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी करून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील #देवळाली मतदारसंघातून प्रस्तावित #रिंगरोड अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू असून जमिनी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत शासन सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सर्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सांगितले.

#विधानसभालक्षवेधी
अमरावती जिल्ह्यातील #अचलपूर नगरपालिका क्षेत्रातअमृत योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या #पाणीपुरवठा प्रकल्पाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तपासणी करण्यात आली असून प्रकल्पात कोणतीही अनियमितता आढळलेली नाही. मात्र काही भागात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक असलेली क्रॉस लाईन कनेक्शनची कामे नगरपरिषदेकडून सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त https://mahasamvad.in/193590/
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा