मंगळवार, १० मार्च, २०२६

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

 




 

मुंबईदि. १०: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.

 

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा  हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.

 

सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.

 

शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधान परिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हेमाजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाअन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवळअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीपोलीस महासंचालक सदानंद दातेपोलीस आयुक्त देवेन भारतीमुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे व  इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा