महाराष्ट्र
शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण कला संस्कृती जतन व संवर्धन
करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध
अमरावतीत
‘वैशिष्ट्यपूर्ण कला’ लोकसंस्कृती कार्यक्रमाचे आयोजन
दि.
१२ मार्च अमरावती : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय
महाराष्ट्र राज्य आयोजित राज्याच्या लोकसंस्कृतीचा वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारसा
जपण्यासाठी “वैशिष्ट्यपूर्ण कला” या विशेष सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक १४ ते १५ मार्च २०२६ रोजी
सायंकाळी ६.०० वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे संपन्न होणार आहे.
या
कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील सुमारे १०० लोककलावंत सहभागी होऊन पारंपरिक
लोककलांचे सादरीकरण करणार आहेत. यामध्ये डहाका, दंडार, खडीगंमत, कृषी कला, आदिवासी
नृत्य तसेच स्थानिक लोककला यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रकारांचा समावेश असणार आहे.
या माध्यमातून राज्यातील समृद्ध लोकपरंपरा, संस्कृती आणि लोकजीवनाचे वैभव प्रेक्षकांसमोर
उलगडणार आहे.
या
उपक्रमाची संकल्पना ॲड. आशिष शेलार, मा. मंत्री
(सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान) यांची आहे. तसेच या कार्यक्रमास मार्गदर्शन
डॉ किरण कुलकर्णी यांची लाभले आहे.
हा
कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. या सांस्कृतिक सोहळ्यास
सर्व कला रसिक नागरिकांनी उपस्थित राहून लोककलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन
श्री श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.
०००००

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा