गुरुवार, १२ मार्च, २०२६

विभागीय आयुक्तालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन


 

अमरावती, दि. 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

राज्याच्या प्रगतीसाठी   यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या कार्याची आठवण करुन देत, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.

वनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर आयुक्त सुरज वाघमारे, उपायुक्त रविंद्र जाधव, संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

                                                                ooooo

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा