सोमवार, २३ मार्च, २०२६

 


नवी दिल्ली येथे आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांची एकमताने निवड करण्यात आल्याची घोषणा संमेलनाच्या निमंत्रक आर. विमला तसेच स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. सरहद संस्था, पुणे आणि नवीन महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने हे दोन दिवसीय संमेलन ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंतीचे औचित्य साधून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा