बुधवार, १८ मार्च, २०२६

गुढीपाडव्यानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 



मुंबई, दि. १८ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुढी पाडवा तसेच नूतन वर्षानिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या.

 

            देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटीचंड  म्हणून साजरा केला जातो.

 

            गुढी पाडव्याचे मंगल पर्व तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादी, चेटीचंड तसेच संसर पाडवो निमित्तदेखील मी सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.     

००००

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा