मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'BIMSTEC यंग प्रोफेशनल्स एक्सचेंज प्रोग्राम'च्या पहिल्या आवृत्तीचे उदघाटन.
यावेळी भारतासह BIMSTECचे इतर सदस्य असलेल्या श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश या देशांचे युवा शिष्टमंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
Young delegations from India and other BIMSTEC countries like Sri Lanka, Nepal, Thailand, Bhutan, Myanmar, and Bangladesh, and other dignitaries were present.
इस दौरान भारत के साथ BIMSTEC के अन्य सदस्य देश श्रीलंका, नेपाल, थाईलैंड, भूटान, म्यांमार और बांग्लादेश के युवा प्रतिनिधिमंडल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
BIMSTEC – सहकार्य, विकास आणि समृद्धीची नवी दिशा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधान भवन, मुंबई येथे 'BIMSTEC यंग प्रोफेशनल्स एक्सचेंज प्रोग्राम'च्या पहिल्या आवृत्तीचे उदघाटन पार पडले. भारतासह BIMSTEC चे सदस्य देशांमध्ये विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले युवा शिष्टमंडळ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात आल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने पायाभूत सुविधा आणि धोरणाधारित औद्योगिकीकरणावर आधारित विकासाचा मार्ग स्वीकारला आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीसोबत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग व फ्रंटियर टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात ‘एज्यु सिटी’, ‘स्पोर्ट्स सिटी’, ‘मेडिसिटी’, ‘जीसीसी हब’ आणि ‘इनोव्हेशन सिटी’ अशा भविष्योन्मुख शहरांच्या उभारणीवर भर दिला जात आहे. तसेच 'ॲग्रीस्टॅक' व ‘महाविस्तार-एआय' या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत पिके, हवामान आणि कीड-रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
स्पेस टेक्नॉलॉजी, एरोस्पेस आणि जिओस्पेशियल डेटा या क्षेत्रांत सहकार्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून, नव्या तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्यासाठी राज्यात मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि ‘फंड ऑफ फंड्स’सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. जागतिक पुरवठा साखळीतील बदलांच्या पार्श्वभूमीवर BIMSTEC सारख्या प्रादेशिक सहकार्य मंचांचे महत्त्व वाढत आहे आणि त्यातून ज्ञानाची देवाणघेवाण व परस्पर पूरक विकासाला चालना मिळेल. तसेच पर्यटनाच्या क्षेत्रातही मोठ्या संधी असून जगभरातील पर्यटकांनी महाराष्ट्रात यावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच प्रादेशिक क्रीडा स्पर्धा व पर्यटनाच्या माध्यमातून देशांमधील संवाद व सहकार्य अधिक दृढ होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ब्रेन ड्रेन’ हा पूर्वी चिंतेचा विषय होता, मात्र आता परिस्थिती बदलत आहे. यासह अधिकाधिक सक्षम मानवी संसाधन निर्माण करण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
BIMSTEC देशांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण देत भारतात उभारल्या जात असलेल्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या कॅम्पसमुळे दर्जेदार शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले आणि युवा शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा