साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून #मराठी भाषेतील ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेत लेखकाने आपल्या आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि वैचारिक प्रवास यांचे प्रभावी चित्रण केले आहे. या साहित्यकृतीला मिळालेल्या पुरस्कारामुळे मराठी साहित्यविश्वाचा गौरव वाढला आहे.
साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. २०२५ च्या साहित्य अकादमी पुरस्कारांचे वितरण ३१ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/194330/
#साहित्यअकादमीपुरस्कार
#मराठीसाहित्य
#मराठीभाषा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा