शुक्रवार, २० मार्च, २०२६


पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ चा निकाल जाहीर केला असून तो परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीइटी अथवा सीटीइटी उत्तीर्ण झाल्याची माहिती भरण्यासाठी २२ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी झाल्याने आता ही माहिती https://mscepune.in/dtedola/KP2026Info.aspx या लिंकवर २२ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत भरण्याची अतिरिक्त संधी देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा