नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला
अमरावती, दि.
29 : श्रीमती नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. श्वेता सिंघल यांच्याकडून
आज स्विकारला. श्रीमती गुंडे ह्या यापूर्वी महिला व बालविकास आयुक्त म्हणून महिला व
बालविकास आयुक्तालय पुणे येथे कार्यरत होत्या. त्या भारतीय प्रशासकीय सेवेतील 2008
च्या तुकडीच्या महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी आहेत.
यावेळी उपस्थित
अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, विभागीय आयुक्तालयाचे अपर आयुक्त सुरज वाघमारे,
अजय लहाने यांनी श्रीमती गुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
0000

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा