मंगळवार, १७ मार्च, २०२६

बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प

 



मुंबईतील मध्यमवर्गीयाच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हे सरकार कटीबद्ध आहे. मुंबईतील #बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा विकास होऊन रहिवाशांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार असल्याचे सांगून बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आपली घरे विकू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मार्फत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.


बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित होता यामध्ये अनेक अडचणी होत्या. यामुळे राज्य शासनाने निर्णय घेतला की, व्यावसायिक बिल्डरवर भरवशावर अवलंबून न राहता हा प्रकल्प राज्य शासन करेल. देशातील सर्वोत्तम कंपन्यांना हे काम देऊन हा प्रकल्प उत्तमरित्या तयार झाला. मुंबईतील इतर पुनर्विकासाचे काम वेगाने झाले पाहिजे यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू असून २०२९ पर्यंत सर्व घराच्या चाव्या रहिवांशाना देण्याचे उद्द‍िष्ट्य आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

#बीडीडीचाळपुनर्विकास
#BDDChawlRedevelopment

@devendra_fadnavis
https://x.com/Dev_Fadnavis
https://x.com/CMOMaharashtra
#DevendraFadnavis
#CMOMaharashtra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा