समतानगर कांदिवली (पूर्व) येथील मध्यम उत्पन्न गटाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम १ एप्रिल २०२६ पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. या कामाच्या प्रगतीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल. कामात विलंब झाल्यास विकासकावर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
या प्रकल्पातील ३१८ निष्कासित सदनिकाधारकांपैकी ३१० जणांचे भाडे मार्च २०२६ पर्यंत देण्यात आले असून उर्वरित आठ जणांचे भाडे देण्याचे आदेशही देण्यात येतील. तसेच दरवर्षीचे भाडे आगावू देण्याबाबत सूचित केले जाईल. अधिवेशन संपल्यानंतर सर्व संबंधितांची या विषयी पुन्हा बैठक घेतली जाईल – मंत्री देसाई
सिंदेवाही (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकुलात आवश्यक क्रीडा सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. राज्य क्रीडा विकास समितीमार्फत या संकुलाच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यासाठी एक कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. सुधारित आराखडा व अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. संकुलात हॉकी ॲस्ट्रोटर्फ व ४०० मीटर धावनमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे – मंत्री भरणे
मुंबईतील बेस्ट बस सेवेबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
मुंबईत किमान १० हजार बसची आवश्यकता आहे. यासाठी बेस्टने विविध कंत्राटदारांना ६,५५५ बस पुरवठ्यासाठी वर्क ऑर्डर दिल्या होत्या. मात्र, कंत्राटदारांकडून बस वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने अपेक्षित प्रमाणात बससेवा वाढवता आली नाही. मार्च २०२३ पर्यंत १,३०० बस उपलब्ध होणे अपेक्षित होते, मात्र सध्या केवळ ६८५ बस उपलब्ध झाल्या आहेत – राज्यमंत्री श्रीमती मिसाळ
वरील प्रश्नोत्तरासंदर्भातील सविस्तर वृत्त - 

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा