बुधवार, ११ मार्च, २०२६

#UPSC #सारथी


 नुकत्याच जाहीर झालेल्या झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०२५ चा अंतिम निकालात सारथी, पुणे संस्थेच्या १२ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

यशस्वी बारा विद्यार्थ्यांची रॅंक व नावे पुढीलप्रमाणे कार्तिक रवींद्र बच्छाव (१७७), हर्षवर्धन हरिश्चंद्र पाटील (३४९), कुणाल संजय अहिरराव (४३०), श्रुती संतोष चव्हाण (५२७), धनंजय संजय दिघे (५२९), अविष्कार विजय डेर्ले (५९१), अभिषेक अशोक टेकाडे (६१०), अश्विनी अरुण कोळेकर (६७५) अल्पेश भाऊसाहेब ढवळे (६८७), सूरज माणिकराव सूर्यवंशो (७०२), रामेश्वर महादु शिंदे (७०५), राजश्री शांताराम देशमुख (७५४).
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील उमेदवारांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सारथी संस्था प्रयत्नशील आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा