राज्यातील परीक्षार्थींना एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज भासू नये, यासाठी परीक्षांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे परीक्षार्थींना वेगवेगळे परीक्षा शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. तसेच अन्य राज्यातील तसेच केंद्र सरकारच्या परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काचा समितीमार्फत अभ्यास करून शुल्क सवलतीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील आतापर्यंत सीसी दिलेल्या इमारतींपैकी बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या प्रश्नी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेऊन ओसी देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात येत आहेत, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
वरील लक्षवेधींसंदर्भातील सविस्तर वृत्त - ![]()

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा