राज्यातील #जलजीवनमिशन अंतर्गत एकूण ५१,५६० #पाणीपुरवठा योजना मंजूर असून त्यापैकी
२६,४९९ योजना पूर्ण झाल्या आहेत उर्वरित २५,०६१ योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. अपूर्ण
योजनांसाठी केंद्र शासनाकडून लवकरच निधी प्राप्त होणार आहे अशी माहिती पाणीपुरवठा व
स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली.
#विधानसभाप्रश्नोत्तरे
जव्हार तालुक्यातील तिलोंडा अंतर्गत चांभारशेत–तिलोंडा
मुख्य रस्ता (ग्रामीण मार्ग ९४) ते आंबेपाडा हा १८०० मीटरचा अवर्गीकृत ग्रामपंचायत
हद्दीतील रस्ता आहे. २०२४–२५ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण #रोजगारहमी योजनेतून ४६ लाख निधीतून
माती-मुरुम व खडीकरणाचे काम पूर्ण झाले असून सध्या जीप व चारचाकी वाहनांनी वाहतूक शक्य
आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला
असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
यांनी विधानसभेत दिले.
#विधानसभाप्रश्नोत्तरे
महात्मा ज्योतिराव फुले #जनआरोग्ययोजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री
जन आरोग्य योजना लागू असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर शासनाकडून कारवाई
करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर
यांनी विधानसभेत दिली. योजनांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.)
आधारित यंत्रणेचा वापरही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
#विधानसभाप्रश्नोत्तरे
#वसईविरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील
प्राथमिक #आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे महानगरपालिकेकडे
हस्तांतरित करण्याच्या विषयावर शासन सकारात्मक असून या संदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याची
माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान सभेत दिली.
प्रश्नोत्तरांसंदर्भातील सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/194272/
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
https://ddamravati.blogspot.com/
https://www.facebook.com/ddamravati/

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा